दि.१५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक . सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे येरवडा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन अहमद वाहिद खान, वय ४५ वर्षे, रा. सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर, समता मित्र मंडळ जवळ, येरवडा, पुणे याच्या ताब्यात एकुण २३,३८,४०० रु.कि.चा ऐवज त्यामध्ये २२,००,०००-रू.कि चे ११० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इत्तर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द येरवडा पोस्टे गु.र.नं.३७/२०२५, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर . अमितेश कुमार,. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर . रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे . शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर . निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक . सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, साहिल शेख, रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, अझिम शेख, संदिप जाधव, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड, अमोल गायकवाड, विशाल निलख यांनी केली आहे.