पुणे ( महागर्जना प्रतिनिधी ) आमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच पोलीस अंमलदार हे पुणे स्टेशन परिसरात दिनांक ३०/०९/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की एक इसम ससून हॉस्पीटल परिसरात अंमली पदार्थ विक्री करीता येणार
आहे.
मिळालेल्या बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील अधिकारी व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता ससून हॉस्पीटलचे समोर आंबेडकर पुतळाच्या कंम्पाउन्ड लगत असलेल्या बसस्टॉप शेजारी पुणे येथे एक इसम संशयितरित्या पाठिवर काळया रंगाची सॅकबॅग घेऊन थांबलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सुभाष जानकी मंडल वय २९ वर्षे, रा. शितला नगर, नुर कार गॅरेज मध्ये देहुरोड पुणे व मुळ राहणार ग्राम दिग्वाघ पोस्ट बासकुपी तहसिल कोहराम जिल्हा देवघर राज्य झारखंड असे सांगीतले. त्याची अंगझडती व बॅगेची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण २,१४,३०,६०० रुपये किमती .चा १ किलो ७५ ग्रॅम ५३ मि.ग्रॅ. मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज अनधिकाराने बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यास सदरचा अंमली पदार्थ हा ससून हॉस्पीटल वॉर्ड क्र. १६ मध्ये उपचाराकामी अॅडमिट असलेला येरवडा जेल कैदी इसम नामे ललीत अनील पाटील वय ३४ सध्या ससुन वॉर्ड क्रमांक १६ युटी क्रमांक ३३५२ / २०२३ येरवडा जेल पुणे याने ससुन हॉस्पीटल कॅन्टीनमध्ये काम करणारा इसम नामे रौफ रहिम शेख, वय १९ वर्षे, रा १३ ताडीवाला रोड पुणे याचे करवी विक्री करीता पुरवीला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या तिघांविरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं.३०६ / २०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) २९ भादवि क्र. २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला असुन दाखल गुन्हयाचा तपास शुभांगी नरके, पोलीस उप-निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे पुणे शहर हे करत आहेत.
सदरील नमुद कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) रामनाथ पोकळे, . पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ . सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक शुभांगी नरके, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, सहा. पोलीस फौजदार , शिवाजी घुले, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी दिशा खेवलकर, साहिल शेख, महेश साळुंके, संदिप शेळके, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.