सदर गुन्हयातील आरोपी गौरव दिग्विजयसिंह पांडे, वय २८ वर्षे, राहनार बी ६८, न्यु फ्रेडंस कॉलनी, नवी दिल्ली याने बंबल ऑनलाईन डेटिंग ॲपवरून गुन्हयातील फिर्यादी यांचेशी ओळख निर्माण करून तो दिल्ली येथे इन्कम टॅक्स रेड कमिशनर असल्याचे खोटे सांगून, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांचेवर अत्याचार करून, त्याचा मोबाईल फोन बंद करून तो फरार झाला होता, त्यानुसार दिनांक ०१/११/२०२३ रोजी बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३३९/२०२३ भा.द.वि.कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील पाहिजे आरोपी गौरव पांडे याचे शोधासाठी तांत्रिकरित्या तपास केला असता तो नवी दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यात शासकीय आधिकारी म्हणुन आपली ओळख सांगुन राहत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार कुसाळकर व सरक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे जावून शोध घेवून त्याला नमुद गुन्ह्यात अटक केली आहे. अटक आरोपी गौरव दिग्विजयसिंह पांडे, वय २८ वर्षे, राहनार बी६८, न्यु फ्रेडंस कॉलनी, नवी दिल्ली याने सिहंगड पोलीस ठाणे हददीत राहणारे तक्रारदार यांनाही तो नवी दिल्ली येथे इन्कम टॅक्स कमिशनर असल्याने त्याची शासकीय उच्चअधिकारी यांचेसोबत ओळख असल्याचे सांगुन तक्रारदार यांना आर.बी.आय. बँकेचे बनावट गोल्ड बॉन्ड देवून तसेच त्यांचे मुलीस बनावट सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र देवून त्यांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याने त्याचेविरुध्द सिहंगड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५/२०२४, भादंवि कलम ४०६,४२० अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीने फरासखाना पोलीस स्टेशन पुणे हद्दीमधील तक्रारदार यांची फसवणूक केलेबाबत तक्रार प्राप्त असून अशा प्रकारची अन्य कोणाची फसवणूक झाली असल्याने त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा.
हि कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे .संजय सुर्वे, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक . संदिपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, महिला पोलीस उपनिरीक्षक, वैशाली तांगडे, स फौजदार मोहन काळे, पोलीस अमंलदार अनिल कुसाळकर, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञाना बड़े, विशाल मोहिते यांचे पथकाने केली.