पुणे (सतीश जाधव )
दि.११ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना त्याच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, कर्नाटक राज्य मधील कुख्यात धर्मराज चडचंण (DMC) टोळीचा म्होरक्या मड्डू ऊर्फ माडवालेय्या हिरेमठ, हा त्याचे साथीदारांसह घातक अग्निशस्त्र घेवुन पुण्यात येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शना नुसार तपास पथक व पोलीस ठाणे कडील उपलब्ध कर्मचा-यांची तातडीने ४ पथके तयार करुन नगर रोड ते पर्वती हद्दी पर्यंत सापळे लावले. त्यानंतर संशयीत आरोपी हे त्याचे कडील पांढ-या रंगाचे गाडीमधुन लक्ष्मीनारायण टॉकीज पर्वती पुणे येथे आले बाबत माहिती दि. १२ रोजी कळाल्याने पोलीसांनी सर्व पथके एकत्र करुन तेथे ३ संशयीतांना गाडीसह शिताफीने पकडले असुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यानी त्याचे नावे. माडवालेय्या पंचय्या हिरेमठ, वय ३५ वर्षे, रा. एपीएमसी मार्केटजवळ बंबलक्ष्मी इंडी रोड, ता. जि. विजापुर कर्नाटक राज्य, सध्या रा. इलेवन पार्क, पिसोळी उंड्री, पुणे,सोमलींग गुरप्पा दर्गा, वय २८ वर्षे, रा. एम. बी. पाटीलनगर, सोलापुर रोड विजापुर, ता. जि. विजापुर कर्नाटक राज्य, मुळपत्ता जालगेरी ता. जि. विजापुर, प्रशांत गुरुसिध्दप्पा गोगी, वय ३७ वर्षे, रा. गल्ली नं. २ शिवशंभो नगर, कात्रज कोंढवा रोड पुणे, मुळपत्ता मु.पो. देवतगत, जुन्या मश्जिद जवळ, ता. सुरपुर जि. यादगीर, राज्य कर्नाटक अशी सांगितले त्याचे अंगझडती घेतली असता त्याचे कडे तिघांचे कंबरेला ला ३ देशी बनावटीचे पिस्तुल च एकुण २५ जिवंत काडतुसे मिळुन आली, त्यामुळे त्याचे वर पर्वती पोलीस स्टेशन गुरनं.८६/२०२४ भारतीय हात्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्याचे कडुन ०३ देशी बनावटीचे पिस्तुले २५ जिवंत काडतुसे व गुन्हयात वापरलेली गाडी व 5 मोबाईल असे मिळुन ११,९०,००० कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशन चे तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत.
पोलीसांनी त्याचे कडे सखोल चौकशी केली असता उत्तर कर्नाटमधील कुख्यात धर्मराज चडचंण व महादेव बहिरगोंड (सावकार) या टोळयामध्ये वाद आहे. त्यापैकी धर्मराज चडचंण याचा पोलीस चकमकीत मृत्यु झाला असुन त्याचे भाऊ नामे गंगाधर चढचंण यांचा खुन महादेव सावकार याचे टोळीने केलेल्या संशयातुन मंड ऊर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठ याने धर्मराजची (DMC) नावाची गुन्हेगारी टोळी सक्रिय ठेवुन तसेच त्याचा मोरक्या होवुन महादेव सावकारवर ४० साथीदार व
६ गावठी पिस्तुलासह सन २०२० मध्ये हल्ला केला होता. सदर हल्यामध्ये सावकार टोळीचे २ साथीदारांचा खुन झाला होता. परंतु महादेव सावकार बचावला होता. तेव्हा पासुन मड्डु हिरेमठ हा सदर टोळी चालवत असुन त्याने विजापुर जिल्ह्यात खुन व खुनासारखे गंभिर स्वरुपाचे गुन्हे करुन दहशत ठेवली आहे. सध्या तो पुणे येथील कोंढवा पिसोळी भागात मागिल दोन महिन्या पासुन त्याचे परिवारासह विरुध्द टोळीचे भित्तीपोटी राहणेस आहे. पोलीसांनी निवडणुक प्रक्रियेच्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन अचुक माहितीच्या अधारे कौशल्य पुर्वक कामगिरी करुन सदरची अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसासह नमुद विजापुर कर्नाटक मधील टोळी प्रमुख व साथीदारांस शिताफिने पकडुन उत्कृष्ठ कामगिरी केली.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त पुणे शहर . अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त परि. ३ . संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग आप्पा साहेब शेवाळे, पर्वती पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे-पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रविण जगताप, कुलदिप शिंदे, महेश जेधे, दत्तात्रय नलावडे, सुभाष मोरे, नानासाो खाडे, राकेश सुर्वे, व वाहन चालक बनसोड यांनी केली आहे.