पुणे (सतीश जाधव )
दि.२रोजी फिर्यादी यांचे घर बंद असताना घराचे लॉक अज्ञात चोरटयाने उघडुन बेडरुम मधील कपाटातील सोन्याचे दागिने मंग ळसुत्र, रोख रक्कम असा एकुण ३७,००० रु. किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला म्हणुन दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील फिर्यादी यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करित असताना घराची चावी घराच्या बाहेर ठेवत होता का, तसेच त्याच्याकडे घरी नेहमी बिल्डींगमधील कोण गप्पा मारण्यासाठी येत होते, तसेच त्याचे दागिणे घरात कोते ठेवता याबाबत कोणाला माहिती होती, तसेच त्याचे कोणाशी वाद झालेले आहेत का, त्याच्या घराची चावी कोणाकडे ठेवण्यासाठी देता का, किंवा त्याचे घराचे कुलूप कोणाला वापरण्यासाठी दिले होते का याबाबत तपास केला असता त्यांनी त्याच्या बिल्डींग मध्ये फलेंट नं.२०२ मध्ये राहणारी महिला नामे सलमा शेख, वय २४ वर्षे रा. कोंढवा पुणे हिने तिच्या घराला लावण्यासाठी कुलूप नेले असल्याचे, तसेच तिला घरात कोठे दागिणे ठेवत असता याबाबत माहिती असल्याचे सांगितले.
सदर संशयीत महिलेस पोलीस ठाणे येथे बोलावुन कौशल्यपुर्ण तपास केला असता तिने फिर्यादी यांच्या सोबत वाद झाले होते. त्यामुळे दि.०२ रोजी फिर्यादी यांच्या घराची चावी त्यांनी बाहेर ठेवल्याचे माहिती असल्याने ती घेवुन घरात जावुन कपाट उघडुन चोरी केल्याचे कबुल केले. सदर महिलेच्या घराची घरझडती घेतली असता चोरी केलेले दागिणे तिच्या घरातील बंद वॉशिग मशीनमध्ये लपवुन ठेवल्याचे मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी हि अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त. परि.५ आर.राजा, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहूरावं साळवे कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) .मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, शहिद शेख, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.