पुणे : (महागर्जना प्रतिनिधी) एका केक मटेरियलच्या दुकानाचे गल्ल्यातील रोख रक्कम ५,२५,००० रुपये चोरी झाल्याची घटना खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधिल काशेवाडी भागात घडली होती.
, तक्रार दार हाफिजुर रहेमान कयामुद्दीन अन्सारी, वय ५० वर्षे, धंदा- केक मटेरिअल विक्री, राहणार,गिरनार क्लासिक सोसायटी अॅक्सीस बँकेच्या वरती, नानापेठ, पुणे यांचा केक मटेरियल विक्रीचा व्यवसाय असुन गेली २५ वर्षापासुन अशोकनगर कॉलणी, काशेवाडी भवानी पेठ, पुणे येथे रिगल एजन्सी नावाने केक मटेरिअल विक्रीचे होलसेल दुकान आहे. १५/१०/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता ते स्वतः दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यावेळी आठवडयातील व्यवसायातून जमा झालेली रोख रक्कम रु. ५,२५,००० मोजुन दुकानातील ड्रावर मध्ये ठेवली होती.तसेच शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने बँकेत रक्कम भरणा केली नव्हती. त्यानंतर दिनांक १६/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता,. दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम ५,२५,००० रुपये मिळुन आली नाही. त्याबबत त्यांनी लगेच खडक पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३६२/२०२३ भा.दं.वि . कलम ३८०, ४५७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
घरफोडी सारखा गंभीर गुन्हा घडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी . सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार, सहायक पोलीस निरिक्षक नितीनकुमार नाईक,पोलिस नाईक ७६६१ तांबोळी, पोलिस शिपाई .८५०० पांडे, पोलिस शिपाई १८०४ शेख यांचे तपास पथक नेमण्यात आले. नेमण्यात आलेल्या पथकामार्फत अज्ञात चोरटयाचा शोध चालु असताना तपास पथकातील अंमलदार पो.शि.८९४८ चव्हाण, पो.शि. ९१०२ बाबळे यांना त्यांचे गोपनीय खब-यामार्फत माहीती मिळाली की, काशेवाडी येथे राहणारा झुरळ्या ऊर्फ आकाश पाटोळे याने रात्री अशोकनगर कॉलनीत चोरी केली असुन तो पळुन जाण्याच्या तयारीत आहे. अशी माहीती मिळाल्यानंतर तात्काळ वरील दोन पथकांमार्फत त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे, वय २७ वर्षे, धंदा- मजुरी, रा. अंजुमन मस्जीद शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे यास दत्तमंदीराजवळील सार्वजनिक शौचालयाजवळुन ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडुन गुन्हयात चोरी करुन लपवुन ठेवलेली रोख रक्कम ५,२५,००० हस्तगत करण्यात आली. आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन नमुद घरफोडी ची तक्रार प्राप्त झाल्यांनतर अवघ्या दोन तासांतच चोरी केलेल्या संपुर्ण मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळन्यास खडक पोलीसांना यश आले आहे.
सर्व कारवाई ही रितेश कुमार पोलीस आयुक्त, प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १,. अशोक धुमाळ सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी राकेश जाधव,सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पो.उप.निरिक्षक अजीज बेग, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, आशिष चव्हाण, सागर घाडगे, मंगेश गायकवाड, सागर कुडले, अक्षयकुमार चाबळे, रफिक नदाफ, लखन ढावरे, समीर तांबोळी, तेजस पांडे, अश्रफ शेख, तुळशीदास टेमबूरणे यांच्या पथकाने केली.