कोंढवा तपास पथक कडून तडीपार आरोपीस अटक
पुणे (सतीश जाधव )
कोंढवा पोलीस ठाणे कडुन तडीपार करण्यात आलेल्या आरोपी यांचा शोध घेवुन मिळुन आल्यास कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी सूचना केले होते. सदर सूचना प्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व तपास पथक असे तडीपार आरोपी पोलीस ठाणे हद्दीत लपुन राहत आहे का याबाबत तसेच त्याच्या प्राप्त पत्यावर वेळोवेळी जावुन शोध घेत होतो. दि.१० रोजी पोलीस अंमलदार अमोल हिरवे यांना कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीतील तडीपार गुन्हेगार नामे अरबाज पटेल हा काकडेवस्ती येथील लेन नं.३ समोर पी.जे.के.एम. स्कुलच्या शेजारील चालु बाधंकाम बिल्डींग मध्ये झोपलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती.
त्या बातमीप्रमाणे तपास पथकातील स्टाफ असे मिळाले माहीती प्रमाणे बातमीच्या ठिकाणी काकडेवस्ती लेन नं.३ समोर पी.जे.के.एम. स्कुलच्या शेजारील चालु बाधंकाम बिल्डींग येथे गेलो असता एक इसम झोपलेला दिसुन आला. सदर झोपलेल्या इसमा जवळ जावुन खात्री केली असता आरोपी अरबाज अहमद पटेल, वय २० वर्षे, रा. पवार हाईट्स तिसरा मजला फलॅट नं.३०२, काकडेवस्ती, कोंढवा पुणे हा झोपलेला मिळुन आला त्यास ताब्यात घेत असताना त्याच्या अंथरुणाखाली एक लोखंडी सतुर सारखे हत्यार ठेवलेले मिळुन आले सदर हत्यार त्याच्याकडुन जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी यास पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले असताना तो कायदेशीर परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग करुन पुणे शहराचे हद्दीत विनापरवाना प्रवेश करुन लोखंडी सतुर हे शस्त्र जवळ बाळगले असताना मिळून आला आहे. म्हणुन त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले आहे.
हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त. परिमंडल ५ .आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहूरावं साळवे कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, दिनेश पाटील, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, विकास मरगळे, राहुल थोरात, सुहास मोरे, अभिजीत जाधव, आशिष गरुड, रोहित पाटील यांनी केली आहे.