दिनांक 17रोजी पांडवनगर भागात दहशत माजवण्याचे उद्देशाने अजय विटकर, अक्षय जाधव, सुरज जाधव, ऋषीकेश देवकुळे, अदित्य पवार, अनिकेत मंगशवेढेकर, साहिल मांदळे, शुभम सिरकर, राहुल कांबळे, अलोक जाधव व इतरांनी हातामध्ये धारदार हत्यारे, लाकडी दांडकी घेवून पांडव नगर भागात आरडाओरडा शिवीगाळ करीत रोडचे कडेला पार्क असलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान करीत असताना त्यावर फिर्यादी यांनी असे का करता असा जाब विचारला असता त्यांचेवर धारदार हत्याराने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
त्या बाबत चतुश्रृंगी पोलीस स्टेशनं येथे गुन्हा रजिस्टर नंबर 8२७३/२०२३ भादवि कलम ३०७, १२०(ब),४२७,३२३, ५०४, ५०६
(२). R / W. आर्म अॅक्ट ४ (२५) महा पो अधिनियम १४२, महा पो अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण
अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) अन्वये कलम वाढ करण्यात आले आहे.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दिनांक ०८रोजी पेट्रोलींग करीत असताना वर नमुद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे आलोक उर्फ आल्या जाधव राहणार मंगळवारपेठ, पुणे हा त्याचे मित्रास भेटण्यासाठी जुना बाजार चौक, मंगळवारपेठ, पुणे येथे येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार शशीकांत नरूटे, निलेश साबळे यांना मिळाल्याने युनिट १ चे प्रभारी अधिकारी शब्बीर सय्यद यांनी तात्काळ कारवाई करून आरोपीस ताब्यात घेन्याच्या सूचना दिल्याने गुन्हे शाखा युनिट १ कडील पथकाने जुना बाजार चौक, मंगळवारपेठ, पुणे येथे सापळा रचुन पाहीजे आरोपी नामे आलोक उर्फ आल्या अर्जुन जाधव वय १९ वर्ष रा.३२६ मंगळवारपेठ, पुणे यास जुना बाजार चौक येथून ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करीता चतुश्रृंगी पोलीस ठाणेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे,. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – १, पुणे शहर सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ . शब्बीर सय्यद, सहा पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस अंमलदार शशीकांत नरूटे, निलेश साबळे यांचे पथकाने केली आहे.
संपादक : सतीश जाधव.