पुणे : मुंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर ३६७/२०२३. भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५) सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी नामे अनुप ढगे वय २३ वर्षे, राहणार,झेड कॉर्नरजवळ, केशवनगर पुणे हा गुन्हा दाखल झालेपासुन गेले दोन महिन्यापासुन स्वतःचे अस्तीत्व लपवू न फिरत होता, काल रोजी मुंढवा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांचे आदेशाने मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हददीत गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश पाठक यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी हा अनुप ढगे उरुळी कांचन पुणे या ठिकाणी येणार आहे.
त्यानुसार माहीती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविली. त्यांनी लगेच तपास पथकातील अधिकारी सहा पोलीस निरीक्षक संदिप जोरे यांना स्टाफसह बातमी ठिकाणी जावून आरोपी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सपोनी जोरे व स्टाफ यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे अत्यंत चिकाटीनं वरील आरोपी अनुप ढगे वय २३ वर्षे, राहणा र झेड कॉर्नरजवळ, केशवनगर पुणे यास उरुळीकांचन येथील पीएमटी बस स्टॅन्ड येथे सापळा रचुन ताब्यात घेवुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, रंजनकुमार शर्मा,पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, आर. राजा, सहा. पोलीस आयुक्त,हडपसर विभाग पुणे शहर अश्विनी राख मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता रोकडे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे, संतोष काळे, दिनेश भांदुर्गे,संतोष जगताप, महेश पाठक, झुरंगे, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील, पालवे यांनी केली आहे.