पुणे :(सतीश जाधव )
महिला हि दि.३१ रोजी त्यांचे राहते घर बंद करुन माहेरी गेले असताना , कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे राहते घराचे खिडकि तुन घरात प्रवेश केला आणि , कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र, चांदीचे पायातील पट्टया व पैशांचा गल्ला चोरून नेल् त्यानुसार अज्ञात इसमाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४०/२०२४, भादवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा नोंद केला.
दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक, राहुल खंडाळे व तपास पथकाचे स्टाफ करीत असताना, सहा. पोलीस उपनिरीक्षक, बापु खुटवड, पोलीस अंमलदार, संजय गायकवाड, सुशांत फरांदे यांना बातमी मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे आकाश अरुण कांबळे ऊर्फ छोटया, वय-२८ वर्षे, राहनार गल्ली नं.७२, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे याने केला असुन तो सध्या त्याचे राहते घरी थांबला आहे. तपास पथकाचे स्टाफने आरोपीस त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन, सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन तपास केला असता , त्याने या ठिकाणी रात्रीचेवेळी घरफोडी केल्याची कबुली दिली आणी गुन्हा केल्याचे सांगितले. नमुद आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन दाखल गुन्हयात चोरीस गेलेला ३०,२५० रुपये किमतीचे सोन्याचा दागिने व गुन्हयात वापरलेला स्कु-ड्रायवर असा एकुण ३०,३०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. सदरचा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचेवर विविध स्वरुपाचे एकुण २२ गुन्हे दाखल आहेत.
हि कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, पुणे, प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ- २, स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, नंदीनी वग्यानी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे, सहा पो फौज बापु खुटवड, पोलीस अंमलदार, बजरंग पवार, संजय गायकवाड, अमोल पवार, निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, पोलीस अंमलदार महेश मंडलीक,नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, विशाल वाघ यांनी केलेली आहे.