पुणे: (सतीश जाधव ) शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी या गुन्हयांना आळा बसावा याकरीता पोलिसांनी मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. लोणीकंद पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ७३६/२०२३.भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० ३४ या गुन्हयाचा तपास युनिट ६. मार्फत चालू असताना महिला पोलीस अंमलदार, ज्योती काळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा ओकार गोसादी याने केला असून, तो हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथे थांबलेला आहे. त्याचेकडे नंबर नसलेली दुचाकी मोटार सायकल आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाली.
रजनीश निर्मल वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन ओंकार सुरेश गोसावी, वय २१ वर्षे, राहणार सहारा प्रेस्टीज शेजारी जगदाळे निवास, भेकराईनगर, हडपसर, पुणे यास दिनांक ०९/०९/२०२३ रोजी ताब्यात घेतले. त्याचे ताब्यात नंबर नसलेली दुचाकीबाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने, त्यास विश्वासात घेऊन तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालकासह त्याने केल्याची कबुली दिल्याने त्याचे साथीदारास ताब्यात घेऊन त्यांनी गुन्हा करणेसाठी वापरलेली दुचाकी मोटार सायकल त्यांचे ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम त्याचप्रमाणे वेग-वेगळ्या कंपनीचे ०५ मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 3,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमुद आरोपी ओंकार सुरेश गोसावी यास न्यायालयाने दिनांक १२/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास रजनीश निर्मल वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर कडील पोलीस उपनिरीक्षक, सुरेश जायभाय हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, . अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे . अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ०२ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायमाय भैर वनाथ शेळके, पोलीस अंमलदार, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
संपादक : सतीश जाधव.