पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मागील काही महिन्यांपासून महागड्या कार चोरी घटनांमध्ये वाढ झालेली होती. कार चोरी करणारे गुन्हेगार काही मिनिटांमध्येच कार चालू करून चोरी करीत होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आवाह्नन पोलीसांसमोर होते.
. विनय कुमार चौबे , पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, .डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त यांनी कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे व त्यास प्रतिबंध करणे याकरिता विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशीत केलेले आहे.
दिनांक ०१/०१/२०१७ रोजी वाकड पोलीस ठाणे हद्दीतून झुंडाई क्रेटा कार चोरी झालेबाबत गु.र.नं. ०३/२०२७ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(७) अन्वये दाखल आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी . विशाल गायकवाड पोलीस उप आयुक्त, परि-२ व . सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त , वाकड विभाग यांचे मागदर्शनाखाली निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी चोरीस गेलेल्या झुंडाई क्रेटा कारचा शोध घेणेकरिता तपास पथकाचे सपोनि. सुभाष चव्हाण व पोउपनि. अनिरुध्द सावर्डे यांची दोन तपास पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले.
तपास पथकाने अथक परिश्रम घेऊन अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या क्रेटा कारचा शोध घेणेकरिता घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसर मुंबई एक्स्प्रेस, जुना मुंबई हायवे रोड लोणावळा परिसारातील सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निरीक्षण व तांत्रिक तपासावरुन ०३ आरोपीना दि. ०६/०१/२०१७ रोजी बिर्ला हॉस्पीटल, थेरगाव येथे सापळा लावून ताब्यात घेतले.
१) अल्ताफ कासम अत्तार, वय ४० वर्षे, रा. प्रथमेश अपार्टमेंट, फ्लॅट नं. २, शितलानगर नं.१,
मामुर्डी, देहुरोड, पुणे.
२) जुबेर कयामुद्दीन कुरेशी, वय ३४ वर्षे, रा. २६४, सोती गंज, मेरठ थापरनगर, मेरठ, राज्य उत्तर प्रदेश.
३) मुसाहिद अलीयारा खान, वय ३१ वर्षे, रा. गांधी कॉलणी, छोटी मरिजदचे जवळ, वॉर्ड नं. ५, थाना समालखा, जि, पानीपत, राज्य हरियाना.
सदरचे आरोपी हे वेगवेगळ्या राज्यातील व अतिशय सराईत असल्याने सुरुवातीस ते काहिही माहिती देत नव्हते. तपास पथकाने त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्यांनी वाकड पोलीस ठाणे, गु.र.नं. ०३/२०२५ मधील गुन्ह्यातील कार चोरी केल्याची कबुली दिल्याने दिनांक ०६/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचा आणखी एक साथिदार ४) जानीशार कमर अली, वय ३८ वर्षे, रा. शिवपुरी, मध्यप्रदेश यास पिंपरी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून सर्व आरोर्पीनी दिनांक ११/०१/२०१७ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे.
पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये आतापर्यंत झुंडाई कंपनीच्या ०३ क्रेटा कार हस्तगत करण्यात आलेल्या असून पिंपरी चिंचवड व नवी मुंबई आयुक्तालयातील ०६ असे
एकुण ०९ कार चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ०३/२०२५ झुंडाई क्रेटा कार क्र. MH 14 KL 8887
२) चिंचवड पोलीस ठाणे गु.र.नं. ०२/२०१७ झुंडाई क्रेटा कार क्र. MH 14 JH 7239,
३) भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०७/२०२४ झुंडाई क्रेटा कार क्र. MH 14 KB 9119 कार जप्त करण्यात आलेल्या आहेत.
४) तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली किया सेल्टोंस कार क्र. MH 45 AL 7533 जप्त करण्यात आली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे-
५) वाकड पोलीस ठाणे, गु.र.नं. १२५५/२०२४
६) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. १२६०/२०२४
७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, गु.र.नं. ६२०/२०२४
८) भोसरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ८०५/२०२४
९) पनवेल शहर पोलीस ठाणे, गु.र.नं. ३७/२०२४
१०) पनवेल शहर पोलीस ठाणे, गु.र.नं. ८७/२०२४
अशाच प्रकारचे अटक आरोपी अल्ताफ कासम अत्तार याचेविरुध्द दिल्ली येथे ३ गुन्हे व आरोपी मुसाहिद अलीयास खान यांचेविरुध्द दिल्ली येथे 7 गुन्हे दाखल आहेत.
कार चोरी करुन तिची विल्हेवाट लावण्यापर्यंतची आरोपींची कार्यपध्दती
कार चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी मधील आरोपी हे हुंदाई कंपनीचे सन २०२१ ते २०१३ मॉडेल मधील ऑटोमॅटीक बटन स्टार्ट डिझेल क्रेटा कारचा आरोपी. आल्ताफ अत्तार हा स्थानिक रहिवाशी असल्याने त्याला पिंपरी चिंचवड परिसराची चांगली ओळख असल्याने तो गाडीचा शोध घेण्यापासून ते लोणावळा येथे गाडी पोहचविण्यापर्यंतचे काम पाहतो. अल्ताफ याचेकडील कारमध्ये चोरी केलेल्या कारचा फुटलेल्या काचा बदलण्यासठी अगोदरच काचा ठेवलेल्या असतात. आरोपी मुसाहिद अलीयास खान हा झुंडाई कंपनीचे गांड्याचा एक्स्पर्ट मेकॅनिक असून त्याला विशेषतः क्रेटा कार संबंधात विशेष ज्ञान आहे. त्याने गाड्या चोरी करण्यासाठी सोबत कानपूर येथून धुंडाई कंपनीच्या विवीध मॉडेलच्या बनावट चाव्या आणलेल्या आहेत तो गाडी पाहिल्यानंतर त्या गाडीचे मॉडेल कोणत्या वर्षीचे आहे, डिझेल व ती चटन स्टार्ट आहे हे ओळखतो. विशेषतः डिझेल बटन स्टॉट गाड्यांना मार्केटमध्ये जास्त मागणी असल्याने चोरीसाठी टारगेट केलेल्या गाडीची ड्रायव्हर साईडची काच फोडून त्याचेकडे असलेल्या ओवीडी स्कॅनर डिव्हॉईसव्दारे गाडीची चावी मॅच करुन डिव्हॉईस व्दारे नवीन चावीला अॅक्सेस देऊन ५-१० मिनिटात गाडी चालू करतो. आरोपी जुबेर कुरेशी हा मेरठ उत्तरप्रदेश येथील रहिवाशी असून तो महागाड्यांचे स्पेअर पार्ट विक्री करत होता. त्यामुळे त्याची भारतभर ऑटोमोबाईल गॅरेजचे मालक यांचेशी ओळख आहे. चोरलेल्या गाड्या आल्ताफ व इतरांच्या मदतीने टोल नाके चुकवत लोणावळा येथील आतमधील परिसरात नेवून ठेवतात. तेथे कारमध्ये सोबत आणलेली नविन काच तसेच बनावट नंबर प्लेट बसवून गाडी पार्क करतो. तेथून तो मागणीप्रमाणे विक्री व्यवहार करतो. त्यानंतर आरोपी जानीशार कमर अली हा लोणावळा येथून त्या कार स्वतः किंवा चालकामार्फत जोधपुर, राजस्थान या ठिकाणी जुबेरने सांगितलेल्या ठिकाणी पोहच करतो.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीतील एकुण ७ व नवी मुंबई आयुक्तालयाचे हद्दीतील 2 अशा एकुण ९ कार चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीतील सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेकडून एकुण ५४,४३,३१० रुपये किंमतीच्या ३ झुंडाई क्रेटा कार, १ किया सेल्टॉस, स्नॅकर, कि- मेकर, स्कू-ड्रायव्हर, पकड, एकुण ४० चाव्या त्यामध्ये हुंडाई कंपनीच्या १४ चाव्या, मारुती कंपनीच्या ९ चाव्या, किया कंपनीच्या ६ चाव्या, टोयोटा कंपनीच्या ४ चाव्या, महिंद्रा कंपनीच्या ३ चाव्या, फोर्ड कंपनीच्या २ चाव्या, टाटा कंपनीच्या ३ चाव्या, वेगवेगळ्या नंबर प्लेट व एकुण ५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.
भारतीय व्याय संहिता २०२३ चे कलम १११ मध्ये संघटीत गुन्हेगारी या नविन कलमाचा समावेश करण्यात आलेला असून त्यामध्ये संघटीतरित्या वाहन चोरी करणाऱ्या टोळी विरोधात कठोर शिक्षेचे प्रावधान आहे. गुन्ह्यातील आरोपी हे वाहन चोरी करणाऱ्या टोळीचे सक्रिय सदस्य असल्याने त्यांचेविरुध्द दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ प्रमाणे कलमाचा आतंर्भाव करण्यात आलेला आहे. सदरचे कलम १११ हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत प्रथमच सक्रिय वाहन चोरी करणान्या आंतराज्यीय टोळी विरुध्द वाकड पोलीस स्टेशनकडून लावण्यात आलेले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी अथक परिश्रम घेऊन विनय कुमार चौबे , पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, .डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, . वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, विशाल गायकवाड पोलीस उप आयुक्त, परि-२, . सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखली वाकड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर, सपोनि., सुभाष चव्हाण, पोउपनि अनिरुध्द सावर्डे, श्रेणी पोउपनि. विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार संदिप गवारी, वंदु गिरे, ज्ञानदेव झेंडे, कौतेंय खराडे, सौदागर लामतुरे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दिपक साबळे, मंगेश लोखंडे यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुभाष चव्हाण हे करीत आहे.