- पुणे (महागर्जना प्रतिनिधी) दि. ३१/०८/२०२३ रोजी गुंजन चौकात फिर्यादी है बस स्टॉपवर थांबले असताना असताना मोटार सायकल वरून दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल व खिशातील १२०० रु जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले आहे म्हणून येरवडा पोलिस स्टेशन गु.र.नं. ६०३ / २०२३ मादवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे विश्रांतवाडी भागात येणार आहे. सदरची माहिती मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरी. अंकुश डोंबाळे व पोलीस अंमलदार यांनी तेथे जावून
संशयीत इसमाला पळून जात असताना त्यास पकडले त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता . सोमेश सुभाष कुसाळे वय २५ वर्षे रा टिंगरेनगर पुणे, संतोष गरिबदास खंडागळे वय ३१ वर्षे रा महाराष्ट्र हौसिंग सोसा. येरवडा पुणे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला २,००० किंमतीचा मोबाईल गुन्हयात वापरलेली ४०,००० रू किंमतीची मोटारसायकल असा एकूण ४२,००० रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ४ पुणे शशिकांत बोराटे, सहा. पोलीस (आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील वरीष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कांचन जाधव, जयदीप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक अंकुश डोंबाळे, पो.उप निरी. प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत चिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केलेली आहे.