पुणे : सतीश जाधव
डेक्कन पोलीस ठाणे हददीत हनुमान टेकडी येथे बसलेल्या मुलामुलींना धारदार शस्त्राचा धाक दाखवुन त्यांच्या गळयातील चोन्याची चैन हिसकावुन नेत असले बाबत डेक्कन पोलीस ठाणे येथे जबरीचोरीचे चार गुन्हे दाखल असुन दाखल गुन्हयात डेक्कन पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना प्राप्त असलेल्या तांत्रिक विश्लेषणातुन तसेच इतर प्राप्त माहितीवरुन आरोपी फिरत असलेल्या ठिकाणी हालचालींवर लक्ष ठेवनु गस्त करुन त्यांच्या संदर्भात इतर माहिती प्राप्त करुन त्या आधारे २ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नाव स्वप्नील शिवाजी डोंबे वय ३२ वर्ष, रा. लेन नं ४१, जनता वसाहत पुणे. अनिकेत अनिल स्वामी वय २५ वर्ष, रा, मुळ लेन नं ४१ जनता वसाहत सध्या रा. किरकटवाडी, सिंहगड रोड पुणे असे असल्याचे सांगितले. व गेले वर्षभरापासुन हनुमान टेकडी परीसरात फिरुन धारदार शस्त्राचा धाक दाखवुन मुलामुलींच्या गळयात चेन हिसकवुन घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडुन चोरलेल्या सोन्याचे चार चैन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी त्यांचेवर डेक्कन पोलीस ठाणे, सिंहगडरोड पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
तसेच सदर ठिकाणी डेक्कन पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार गस्त करताना धारदार शस्त्र घेवुन फिरणारे संशयीत मिळून आल्याने त्याच्याकडेअधिक चौकशी केली असता त्यानि त्यांच नाव मॉन्टी ऊर्फ तेजस माणिक खराडे वय २७ वर्षे रा, जनता वसाहत, पुणे असे असुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेवर डेक्कन पोलीस ठाणे येथे गु.र.नं ०५/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल असुन नमुद आरोपी हे दाखल गुन्हयात अटक आहेत. नमुद आरोपी हा देखील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर सिंहगड रोड, दत्तवाडी तसेच डेक्कन पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ १ पुणे . संदिपसिंह गिल्ल, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे साईनाथ ठोंबरे,डेक्कन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक महेश भोसले, अजय भोसले. दत्तात्रय सावंत, सहा. पो. फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, पोलीस अंमलदार गभाले,सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी महेश शिरसाठ यांनी केली.