केशन पार्क उपविभाग निलायम टॉकीज समोर पर्वती, पुणे येथील MSEB म्हणून नोकरीस असलेले गोपाल कैलास-३२ वर्षे गण कॉलनी, जाधव नगर रायकर मळा पुणे यांचा सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे हदीत मनोहर गार्डन जवळ खंडोबा मंदीर रोड, रायकर मळा, पुणे येथे भरदिवसा धारदार हत्याराने अज्ञात इसमाने खून केला असून सदर अज्ञात इसमाचा मा. वरिष्ठांनी शोध घेणेबाबत आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने इकडील पथकाकडील स्टाफला त्याबाबत अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबत पोलीस उप निरीक्षक शेख, व स्टाफ यांना सुचना देवून रवाना केले. त्याप्रमाणे इकडील पथकाकडील पोलीस अमलदार धनंजय वाजणे यांना त्याचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद गुन्यातील अज्ञात इसम हा एस.एन.डी.टी. कॉलेज समोर, कर्वे रोड, पुणे येथे थांबला असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर यांना कळविल्याने त्यांनी सदर बातमीचा आशय सांगितला असता त्यांनी सदर बातमीबाबत मा वरिष्ठांना माहिती देवुन वर नमुद अधिकारी व अमलदार यांना सदर ठिकाणी रवाना करून अज्ञात इसम मिळुन येताच त्यास ताब्यात घेवुन त्यान आमचे समक्ष हजर करणेबाबत आदेशित केले होते?
प्राप्त बातमीचे अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक शेख व स्टाफ असे एस एन.डी.टी कॉलेज समोर, कर्वे रोड, पुणे येथे थांबुन पाहणी केली असता त्याबाबत आमची सर्वांची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव पत्ता सिधांत दिलीप मांडवकर वय- १९ वर्षे, रा. सध्या धायरेश्वर मंदीराजवळ, पोकळे वस्ती, अजिक्य तारा मित्र मंडळ, स.नं. ५५/६ धायरी, पुणे असे असल्याचे सांगितले त्यास अधिक विश्वासात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत त्याचेकडे चौकशी करता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने व दाखल गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बाबत सिंहगड पोलीस स्टेशन गुरन ४२५ / २०२३ भादवी कलम ३०२ महा पो अधि ३७ (१) (३)सह ५३५ अन्वये गुन्हा दाखल असून नमुद आरोपी यास पुढील कार्यवाहीकरीता सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे मा पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा पोलीस सह आयुक्त श्री.. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल माहा पोलीस जायुक्त गुन्हे 4 श्री सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी- गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख पालीस अमलदार प्रदीप राठोड, धनजय वाजणे, मॅगी जाधव व गणेश ढगे, शिवाजी सातपुते व नारायण बनकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.