- पुणे (सतीश जाधव ) वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुंढवा पोलीस स्टेशनं पुणे शहर यांचे आदेशाने मुंढवा पोलिस स्टेशनं गुन्हा रजिस्टर नंबर ३०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस क्रमाका MH12 ft 357 या वाहनाचा व अज्ञात आरोपींचा शोध घेणेच्या आदेश तपास पथक प्रमुख संदीप जोरे व स्टाफ यांना देण्यात आले होते. सदर आदेशावरुन तपास पथक हददीत गस्त करीत असताना तपास पथकातील अंमलदार पोलिस हवालदार दिनेश भांदुर्गे व पोलिस शिपाई सचिन पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दोन मुले संशयीत रित्या काहीतरी अपराध करण्याचे इराद्याने चोरीची दुचाकी घेवुन साज कंपनी जवळ घोरपडी गाव या ठिकाणी फिरत आहेत. त्याबबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाने यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याने मुंढवा तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी त्या ठिकाणी जावुन
संशयीत आरोपीस थांबवुन त्यांचे ताब्यातील मोटारसायकल बाबत त्यांनी खात्रीदा यक माहीती न दिल्याने त्याबाबत संशय आला असता त्यांच्या ताब्यातील वाहन हे मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर . ३०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस ही गाडी चोरलेले निष्पन्न झाले. सदर वाहनावरील आरोपी व त्याचा साथिदार बालक याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडुन एकुण १४ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झालेने ते जप्त करुन त्यांचेकडुन कोंढवा पोलीस ठाणे हददीतील घरफोडीतील सोने व रोख कॅश असा एकुण ७ लाख रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या १४ दुचाकी गाड्यांपैकी ११ गाडयांबाबत पुणे शहर व
परीसरातील पोलीस ठाणेत गुन्हे दाखल असून इतर ३ जप्त वाहनांबाबत अधिक तपास सुरु आहे. वरील गुन्हे हा अटक आरोपी व त्याचा जोडीदार बालक यांनी केले आहेत. पोलीस कस्टडीतील आरोपीचे नाव गोरख विलास धांडे, वय-२० वर्षे, राहणार शिवशंभो नगर, लेन नं.४ इस्कॉन मंदीर चौक, गोकूळ नगर, कात्रज, पुणे असे असुन त्याचेवर घरफोडीचे २ गुन्हे दाखल आहेत.
अटक आरोपी व त्याचा साथिदार वीस बालक यांचेकडुन खालीलप्रमाणे वा हने जप्त करण्यात आलेली असुन सदरबाबत विविध पोलीस ठाणेस दाखल गुन्हे खालीलप्रमाणे आहे.
मुंढवा, मुंढवा,मुंढवा, हडपसर, वानवडी, वानवडी, वानवडी, सिहंगड, कोंढवा, राजगड,सासवड, लोणावळा
लोणावळा शहर ठाणे पुणे ग्रामिण कोंढवा पोलीस ठाणे
सासवड पो ठाणे पुणे
वरीलप्रमाणे गुन्हे उघड केले असुन आणखी तीन दुचाकी बाबत चा तपास चालू आहे..
सदरची कामगीरी रीतेशकुमार पोलीस आयुक्त, संदिप कर्णीक सह पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, . विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त पुणे शहर, अश्विनी राख सहा.पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर,यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
प्रदीप काकडे, पोलीस निरीक्षक गुन्हे,मुंढवा तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप जोरे, दिनेश भांदुर्ग, दिनेश राणे, महेश पाठक,सचिन पाटील,स्वप्नील रासकर, पालवे यांनी केली.