दिनांक ३ रोजी हिरा सदन बिल्डींग, सोमवार पेठ, पुणे येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने उघडया दरवाज्यातुन आंत प्रवेश करून त्यांचे संमतीशिवाय ३३,००० रुपये किंचमतीच ०४ मोबाईल व रोख रक्कम चोरी केली म्हणुन समर्थ पोलीस स्टेशनं येथे गुन्हा रजिस्टर नंबर १९६ / २०२३ भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत वरिष्ठांनी आदेश दिल्याने सदर युनिट १
कडील अधिकारी व अंमलदार गुन्हयांचा समांतर तपास करीत असताना दि. ०९ रोजी पोलीस
अंमलदार, दत्ता सोनावणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयातील इसम हा
सध्या त्रिकोणी गार्डन, भवानी पेठ, पुणे येथे येणार असुन त्याचेजवळ एक संकलंग आहे.
सदर बातमीच्या अनुशंगाने युनिट-१ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने युनिट-१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन बातमीदारांने दिलेल्या वर्णनाप्रमाणे रैय्यान ऊर्फ फईम फय्याज शेख, वय २० वर्ष राहणार.सना बेकरीजवळ, निहाल हाईटस, फ्लॅट नं. ३०३, मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन, गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करीत असताना, त्याचे ताब्यातील सॅक,बॅग दोन पंचासमक्ष उघडुन पाहिली असता त्यामध्ये वेगवेगळया कंपनीचे ३२ मोबाईल हॅन्डसेट मिळून आले आहे. त्याने सदरचे एकूण ३२ मोबाईल हे पुणे शहरातील वेग- वेगळ्या ठिकाणाहून उघड्या दरवाज्या द्वारे व खिडकीवाटे तसेच पायी जाणारे लोकांचे हिसकावून चोरले असलेबाबत कबुली दिली आहे. तसेच त्याचे ताब्यातील दुचाकी मोटार सायकल ही देखील मोबाईल चोरी करण्यासाठी चोरली असल्याचे सांगितले आहे.
सदरचे गुन्हयात त्यास ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ५,६८,३०० रुपये किंमती चे ३२ मोबाईल व ०१ मोपेड गाड़ी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ३२ मोबाईल पैकी ०५ मोबाईल समर्थ पोलीस स्टेशनं कडील वरील गुन्हयातील असल्याचे समजल्याने, त्यास पुढील कारवाईकरिता समर्थ पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी हा कोंढवा पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो रात्री बिल्डींगचे खाली पार्किंग मध्ये पार्क ठेवलेली दुचाकी चोरुन दुचाकीवरुन परिसरात पाहणी करून मोबाईल चोरुन पुन्हा दुचाकी आहे त्याच बिलडींगला पार्क करीत होता.
सदर आरोपीने पुणे शहरातील खडक फरासखाना, कोंढवा, समर्थ पोलीस ठाणे हद्दीत जुलै २०२३ ते ०३ सप्टेंबर २०२३ रोजी दरम्यान चो-या केल्या आहेत. सदर आरोपीकडून आतापर्यंत एकुण ०९ गुन्हे उघडकीस आणले आहे.
तरी खडक, फरासखाना, कोंढवा, समर्थ पोलीस ठाणे तसेच पुणे शहरातील नागरीकांना कळविण्यात येते की, नमुद कालावधी मध्ये पहाटेचे वेळी उघडया दरवाजेद्वारे,खिड़की वाटे कोणाचे मोबाईल चोरीस गेले असल्यास त्यांनी युनिट १, गुन्हे शाखा, पुणे बंगला नंबर . ३, पोलीस अधिकारी वसाहत सोमवार पेठ, पुणे येथे संपर्क साधावा.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदीप कर्णिक, . अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, रामनाथ पोकळे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १. पुणे सुनील तांबे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद,
, पोलिस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, आण्णा माने अभिनव देसाई, अजय थोरात, अमोल पवार, शशीकांत दरेकर यांनी केली आहे.