पुणे : पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हे गाराला मार्केट यार्ड पोलिसांनी ठोकल्या बेडया. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमधील तपास पथकातील कर्मचारी आणि अधिकारी यांना गोपनीय बातमीदारा मार्फत अशी माहिती प्राप्त जहाली कि,आंबेडकर नगर बैल बाजार सार्वजनिक शौचालय येथे एक इसम कमरेला विना परवाना पिस्टल लावून उभा आहे.त्याच्याकडून कोणता तरी गंभीर गुना घडण्याची शक्यता आहे.त्या अनुषंगाने सापळा रचून त्यास पंचा समक्ष ताब्यात घेऊन चौकशी करून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितले.1)अतिश बाळकृष्ण खंडागळे वय 25 रा. बिबेवाडी कोंढवा पुणे असे असल्याचे सांगितल. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे डाव्या बाजुस कमरेला एक पिस्टल व कमरेला पुढील बाजुस लावलेली एक जिवंत काडतूस त्याचे अंगझडती मध्ये मिळून आले. त्यावेळी त्यास सदरचे पिस्टलचे परवाने आहेत का, याबाबत पोउपनि शिंदे यांनी त्यास पंचासमक्ष विचारले तेवा त्याने परवाना नसल्याचे सांगीतले. तसेच त्यावेळी सदरचे पिस्टल कोणाचे आहे व कोठुन आणले याबाबत विचारले असता, त्याने सदरचे पिस्टल माझेच आहे असे सांगुन कोठुन आणले याबाबत उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावेळी पोउपनि शिंदे यांनी सदरचे पिस्टल सुरक्षीत रित्या ताब्यात घेवून त्याचे मॅगझीन बाहेर काढून चेक केले असता, त्यामध्ये प्रत्येकी एक जिवंत काडतुस असे मॅग्झीन मध्ये एक काडतुस मिळुन आले. त्याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. त्याचा पुढील तपास युवराज शिंदे, पोलीस उप-निरीक्षक हे करीत आहेत.
ही कारवाई पूर्व प्रादेशिक विभाग अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ चे पोलीस उप-आयुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त तावरे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे,पोउपनि शिंदे, पोलीस अंमलदार गायकवाड, जाधव, पेंडे, हिरवाळे, यादव, सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.