पुणे :पुणे पोलीस आयुक्तालयातील उत्तमनगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार निरज उर्फ गुण्या सुरज हिनोटिया, वय २० वर्षे, राहनार .एन.डी.ए. पोलीस चौकी मागे, इंदिरा वसाहत, उत्तमनगर पुणे. हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकु, कोयता सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील २ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस पुढे येत नव्हते.
प्रस्तावं व सह कागदपत्रांची पडताळणी करुन . पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये किरण बालवडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस स्टेशन पुणे व चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे अ धिपत्याखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदरची कामगिरी पार पाडली.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम. पी. डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या ८४ कारवाया केल्या आहेत. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.