पुणे ( महागर्जना प्रतिनिधी ) दिनांक ०२/०९/२०२३ रोजी रात्री ०८/३० वाजण्याच्या सुमारास राहते घरातुन फिर्यादी यांचा मुलगा वय १६ वर्षे ६ दिवस हा कोंढवा खुर्ड मनपा शाळेमागे ढोलपथकामध्ये सराव करण्यासाठी गेला तो परत घरी आला नाही. म्हणुन त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फुस लावुन फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे वगैरे मजकुराची तक्रार दिल्याने भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील अपहृत बालक यांचे विषयी विधीसंघर्षित बालक वय १६ वर्षे, राहनार कोंढवा खुद्र पुणे याचे कडे केलेल्या तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले.आहे की त्याला व दाखल गुन्हयातील अपहृत मुलगा यांस दिनांक ०३/०९/२०२३ इसम नामे साईराज उर्फ साया लोणकर, ओंकार कापरे उर्फ आप्पा, रोहन गवळी, पप्पु उर्फ महादेव गजाकोष, राज ठोंबरे, कृष्णा जोगदंड, सौरभ तायडे उर्फ दत्ता, प्रणय सुनिल पवार, अमन व दोन विधीसंर्धित बालक यांनी निल खवळे यांस आमची टिप देतो या कारणावरुन कोढवा येथुन चारचाकी गाडीत बसवुन मंतरवाडीचे आसपास अपहृत मुलगा यास झाडाच्या फांदयानी मारहाण केली. त्यानंतर सासवड येथील दिवेघाटाचे नजीकचे टेकडीचे जवळील रुममध्ये नेवुन त्यास फावडयाचे लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारले आहे.तसेच साक्षीदार यास देखील लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले आहे. त्याबाबत साक्षीदार याचा सविस्तर जबाब घेण्यात आलेला असुन त्यानुसार दाखल गुन्हयात भा.दं.वि कलम ३०२, ३६४, १२० (ब), २०१,३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ मपोका १४२ अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे. म्हणून दिले फिर्यादी वरून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं.८९६/२०२३ भा.दं.वि. कलम ३६३ कलमवाढ ३०२, ३६४, १२०(ब), २०१,३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, मपोकाक १४२ हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे ओंकार चंद्रशेखर कापरे वय २७ वर्ष रा. अलका निवास, संत गाडगेमहाराज, शाळेसमोर, कोंढवा खुर्द, पुणे (टोळी प्रमुख) साईराज राणाप्रताप लोणकर वय २३ वर्षे रा होलेवस्ती चौक उंड्री पुणे व कोंढवा खुर्द पुणे (टोळी सदस्य) प्रणय सुनिल पवार वय १९ वर्षे रा. तानाजी लोणकर यांचे ऑफीस मागे, कोंढवा पुणे (टोळी सदस्य ) सौरभ उर्फ दत्ता माणिक तायडे वय १८ वर्षे रा. मारुती अळी, बावर चौक, कोंढवा खुा पुणे (टोळी सदस्य) कृष्णा प्रकाश जोगदंडे वय २० वर्षे रा. कमलदिप पार्क, कुलपीत अपार्टमेंट बाजुला मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे (टोळी सदस्य) महादेव उर्फ पप्पु गोविंद गजाकोष वय १९ वर्षे रा. शिवनेरीनगर लेन न.६, कोंढवा खुा पुणे (टोळी सदस्य) ७) रोहन अनिल गवळी वय २१ वर्षे रा. ग.नं. २७ शिवनेरीनगर कोंढवा खुर्द पुणे (टोळी सदस्य) राज ठोंबरे रा. ग.नं. २३ शिवनेरीनगर कोंढवा खुर्द पुणे (टोळी सदस्य) (पाहिजे आरोपी ) अमन पुर्ण नाव पत्ता नाही (पाहिजे आरोपी) दोन (विधीसंघर्षित बालक) यातील दाखल गुन्हयात अ.क्र. १ ते ७ यांना अटक करण्यात आलेली असुन दोन विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. अ.क्र.८ व ९ हे पाहिजे आरोपी आहेत. नमुद आरोपी टोळी प्रमुख १) ओंकार चंद्रशेखर कापरे (टोळी प्रमुख) याने त्याचे साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन, सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार करून किंवा हमला करण्याची धमकी देवून किंवा हमला करण्याची पूर्वतयारी करून स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता त्यांनी संघटितपणे व वैयक्तीकपणे खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, दंगा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे पोलीसांचे आदेशाचा भंग करणे नागरीकांना मारहाण करुन जखमी करणे, शिवीगाळ करुन व हत्यारांचा धाक दाखवुन नागरिकांमध्ये दहशत पसरवणे, चोरी यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर पुणे शहरातील कोंढवा व वानवडी पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे विविध गुन्हे दाखल असून, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.”
दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम कलम ३ (१) (i) . ३ ( २ ) . ३ ( ४ ) प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहुराजे साळवे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५. पुणे विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता.
सदर प्रकरणी छाननी करून कोंढवा पोलीस स्टेशन . गुरजि नं.८९६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३६३ कलमवाढ ३०२,३६४,१२० (ब) २०१,३२६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ म.पो. का. क. १४२ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (i). ३ ( २ ) . ३ ( ४ ) या कलमाचा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग शाहुराजे साळवे हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, . रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परि ५. विक्रांत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. आयुक्त, वानवडी विभाग शाहुराजे साळवे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पो.स्टे . संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, संजय मोगले, पोलीस उप निरीक्षक . समाधान मचाले पोलीस अंमलदार, जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण, हनुमंत रुपनवर, गणेश आगम, शिवलाल शिंदे यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर, गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार, यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले. आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ६२ वी कारवाई आहे.