पुणे ( महागर्जना प्रतिनिधी ) दिनांक २२रोजी क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा चे दर्शनाकरीता आलेली आजी व तिची नात खंडोबा देवाचे दर्शन घेवून नवीन गडावरून जुन्या गडाकडे (कडेपठार मंदिराकडे) पायवाटेने जात होती. त्या दोघीच दुपारचे वेळेस डोंगर रस्त्याने जुन्या गडाकडे जात असताना अनोळखी इसमाने आजी व नात एकटयाच असल्याची संधी साधून त्यांचे सोबत बोलत बोलत जवळच्या मार्गाने जुन्या गडावर नेतो असे सांगितले. अनोळखी इसमाने त्यांना डोंगरावरून दरीतील जानुबाईचे मंदिरात नेले आणि त्या ठिकाणी आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून नातीवर जब रदस्तीने लैंगिक अत्याचार केला. आजीने आरडोओरडा केला, व नातीने प्रतिकार करत अनोळखी इसमाचे डोक्यावर समोरील बाजूला दगड मारल्याने तो जखमी झाला आणि आजी व नात या तेथून पळून आल्या. झालेला प्रकार आजी व तिचे नातीने त्यांचे राहते गावी जावय तिच्या मुलाला सांगितला. त्यानंतर त्यांनी दि २५/०९/२०२३ रोजी जेजूरी पोलीस स्टेशन येथे येवून गुन्हा रजिस्टर न ५८४ / २०२३ भा.द.वि.क. ३७६, ३२३, ५०४, ५०६ बाल लै. अत्याचार प्रति कायदा. २०१२ चे कलम ४, ६,८,१०,१२ अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून . अकिंत गोयल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिन आनंद भोईटे, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तसेच तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांचे सुचनेप्रमाणे पिडीतांकडून मिळालेल्या माहितीचे आधारे तसेच पिडीत बालकाचे सांगण्यावरून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील पोलिस हवालदार वाळुजकर यांनी रेखाचित्र तयार केले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी ताबडतोब पथकासह स्वतः तपासात सहभाग घेवून रेखाचित्र व कपडयाचे वर्णन घेवून तपास अनोळखी इसमाचा शोध सुरू केला. नवीन गडावरून जुन्या गडाकडे जाणारे पायवाटेवरील दुकानदार, तसेच स्थानिक इसमाकडे तपास केला. रेखाचित्र हे गोपनीय बातमीदारांना पुरविल्यानंतर सदरचे रेखाचित्र हे सराईत गुन्हेगार भगवान पडवळ रा. धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे हा असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. भगवान पडवळ हा सध्या मोलमजुरी करत असून तो हिंगणगाव ता करमाळा जि. सोलापूर
या ठिकाणी शेतमजुरी करत आहे,अशी माहिती प्राप्त झाली. सदर ठिकाणी जावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेजूरी पोलिस कडील अमलदाराचे मदतीने भगवान जयवंत पडवळ वय ५४ वर्षे सध्या रा हिंगणीगाव ता करमाळा जि. सोलापूर मुळ रा धामारी ता शिरूर जि पुणे यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असून त्याचेवर यापुर्वी देखील लैंगिक अत्याचार, खुन, जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे त्याने सांगितले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल , पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,बारामती विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी, . तानाजी बरडे, भोर विभाग सासवड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस शिपाई शिवाजी ननवरे, पोहवा विजय कांचन, राजु मोमीण, अतुल ढेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे,पोलिस कोणास्टेबल धिरज जाधव, जेजूरी पोलीस स्टेशनेचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर, सपोनि मनोज नवसरे,पोसई राहुल साबळे, पोलीस उपनिरीक्षक, रूपाली पवार, सफौ सी.डी.झेंडे, पोहवा डी.एस. बनसोडे, व्ही. बी. कदम, . पी. एम. शेंडे, पो. कॉ. गणेश गव्हाणे यानी केली आहे. मा. न्यायालयाने आरोपीस दि.०३/१०/२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे..
पुणे ग्रामीण पोलीस
1/2
आरोपी भगवान जयवंत पडवळ वय ५४ वर्षे सध्या रा हिंगणीगाव ता करमाळा जि सोलापूर मुळ रा धामारी ता शिरूर जि पुणे याचेवर दाखल असलेले गुन्हे
१) शिरूर पो.स्टे गु.र.नं.
२) शिकापुर पो स्टे गुन ३) मंचर पो स्टे गुरन
४) शिरूर पोस्टे गु.र.न
५) शिरूर पो.स्टे गु.र.न
६.) शिकापुर पो.स्टे..
६६/०४ भादवि ३९२, ३४
२०१ / १६ भादवि ३९४, ३०२, ३९७, १२०३, ३४
६४/०४ भादवि ३७६, ३९४ ४५२३४२, ५०६, ३४
१३२/०३ भादवि ३७९
१४०/०४ भादवि ३९२, ३४२, ३४
९४ / १४ भावि ३९४