युनिट 6 ची कारवाई.
पुणे : (सतीश जाधव )पोलीस आयुक्त पुणे अमितेश कुमार यांनी मोक्का आणि इतर गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपी शोध मोहिम राबवणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्या नुसार दि.१२ रोजी गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत पेट्रोलिंग करित असताना युनिट कडील पोलिस अमंलदार मुंढे यांना बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन कडील मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपी तसेच तडीपार राक्या ऊर्फ राकेश थोरात हा भापकर मळा, मांजरी या ठिकाणी थांबलेला आहे.
हि बातमी वरिष्ठांना कळवुन, बातमीचे ठिकाणी भापकर मळा, मांजरी यथे जावुन सापळा रचला होता पोलीस पथक आल्यावर तो पाहुन पळून जात असताना, पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता तो उडवाउडवीचे उत्तर देवु लागला युनिट कडील पोलीस पथकाने त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राक्या ऊर्फ राकेश देविदास थोरात व य २३ वर्षे राहनार जुना हापसा, मांजराई नगर, मांजरी बु. तालुका हवेली जिल्हा पु णे असे असल्याचे सांगितले. त्यास हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयाबाबत विचारना केली असता त्याने सांगितले की, तडीपार असताना गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे चा आवाज कमी करण्याच्या कारणावरुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ बिट्या कुचेकर व आम्ही इतर साथीदारांनी मिळून एकास जबर मारहाण केली होती. त्याबा बत हडपसर पोलीस स्टेशन चा रेकॉर्ड तपासला असता हडपसर पोलिस .गु.र.नं. १४५५/२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२४,३२३,५०४, ५०६,१४१,१४६,१४७,१४८,१४९, क्रिमीनल लॉ, अॅमेन्टमेट अॅक्ट ७. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३)१३५ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२).३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात राक्या ऊर्फ राकेश देविदास थोरात हा मोक्का गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाल्याने पुढील तपाससाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले
या आरोपी विरुद्ध यापूवी हडपसर पो.स्टे येथे १) गु.र.नं.३६०/२०२० भा.दवि.क. ३२४.३२३ व इतर २) गु.र.नं.५१६/२०२१ आर्म अॅक्ट क.४(२५) ३) गु.र.नं.१०९२/२०२१ म.द.वि.३०७ व इतर, ४) गु.र.नं.१३०८/२०२२ भा.द.वि.क.१४३,१४७ व इतर ५) गु.र.नं.८८/२०२३ भा.द.वि.क.३९९,४०२ व इतर प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
हि कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा, पुणे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे सतीश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, नितीन घाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे आणी सुहास तांबेकर यांनी केली.