पुणे : सतिश जाधव
दि.०८ रोजी गुन्हे शाखा, युनिट ४ चे पथक चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जहांगीर पठाण व विशाल इथापे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमा रे एक वर्षापुर्वी मा रहाण करुन दहशत करुन पळुन गेलेला मोन्या ऊर्फ प्रज्योत बाळकृष्ण उमाळे हा गाडी अड्डा, दत्तमंदीराजवळ, खडकी बाजार, पुणे येथे बसले ला आहे अशी बातमी मिळाल्याने त्या बातमी प्रमाणे खात्री करुन कारवाई करणे कामी वरिष्ठांनी आदेश दिले.
मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बातमीतील वर्णनाचा इसम हा गाडी अड्डा, दत्तमंदीराजवळ, खडकी बाजार, पुणे येथे बसला असल्याचे मिळून आल्याने सदर इसमाला ताब्यात घेवुन त्यांच नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोन्या ऊर्फ प्रज्योत बाळकृष्ण उमाळे वय २३ वर्षे रा. राजीव गांधी नगर, घर नं. १९२ खडकी पुणे असे सांगितले. त्यांचेकडे तपास करता, त्याने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु. रजि.न. ७५१/२०२३ भा.दं.वि.स. कलम ३०७, ३२३, १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२).३ (४) प्रमाणे त्याचे साथीदारांसह केला असल्याची कबुली दिल्याने. त्यास पुढील कारवाई करिता सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे . निखिल पिंगळे, . सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ . राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक . अजय वाघमारे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक वैभव मूगदुम, पोलीस अंमलदार प्रविण भालचीम, एकनाथ जोशी, विठ्ठल वाव्हळ, नागेश सिंगकुंवर, जहांगिर पठाण, विशाल ईथापे, देविदास वाढेरे, राहुल परदेशी, सुभाष आव्हाड, महिला पोलीस अंम लदार रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, शितल शिदे यांनी केली.