सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व वाहनचोरी, घरफोडी, अवैध धंदे यासारख्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग डयुटी करीत वडगाव ब्रिजच्या खाली आले असता, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, राजु वेगरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गिरीजा हॉटेलचे बाजुस असणा-या बसस्टॉप जवळुन अंदाजे २० ते २५ वर्षाचे, अंगाने सडपातळ असलेल्या इसमाने दोन दिवसापूर्वी पारे कंपनी चौक येथील हिंदुस्थान पाईप या ठिकाणी रोडवर पार्क केलेली तीन चाकी रिक्षा ही चोरी केली होती. तो इसम स्वामी नारायण मंदीराच्या समोरील सर्व्हिस रोडवर थांबलेला असून त्याने अंगामध्ये निळ्या रंगाचे जैकेट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातली आहे अशी खात्रीशिर बारामी मिळाली.
त्यानुसार बातमी सहा. पोलीस निरीक्षक, सचिन निकम यांना कळविली असता, ती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता, त्यांनी सदर बातमीची खातरजमा करुन योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्टाफसह स्वामी नारायण मंदीर नऱ्हे पुणे येथे जावुन खात्री केली असता, बातमीतील वर्णनाचा इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसल्याने व तो सिंहगड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील वाहन चोरीचे गुन्हयातील असल्याचे समजल्याने तो सदर ठिकाणाहुन पोलीसांना पाहुन पळून जात असताना, त्यास स्टाफच्या मदतीने त्यास काही अंतरावर दि.२० रोजी पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रथमेश ऊर्फ बाब्या अनिल हजारे, वय-३० वर्षे, राहनार धनगरवस्ती, नांदेड फाटा सिंहगड रोड, पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं.३९/२०२४, भादंवि कलम ३७९ २. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.४१/२०२४, भादंवि कलम ३७९ सिंहगड रोड
पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं.६२४/२०२३, भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे केले असून, त्याने चोरी केलेल्या दुचाकी वाहने त्यांच्याकडुन जप्त केली आहेत. तसेच त्याच्याकडुन वळसंग पोलीस स्टेशन सोलापुर (सोलापुर ग्रामीण) गुन्हा रजि नं.२०/२०२४, भादंवि कलम ३७९ हे गुन्हे उघडकीस आणले असुन, त्याचेकडुन एकुण १,८५,००० रुपये किंमतीचे एक तीन-चाकी रिक्षा व तीन मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन, पुढील अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक, सचिन निकम, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
हि कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील,. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-३, पुणे, संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे, अप्पासाहेब शेवाळे, सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप- निरीक्षक, गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उतेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, विकास बांदल, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, अमोल पाटील, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांचे पथकाने केली आहे.