देहुरोड पोलीस स्टेशन हदीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंध घालण्याचे आदेश . पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी दिल्याने देहुरोड पोलीस तपास पथकाने देहुरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ४७८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्याचे घटनास्थळाचे परिसरातील ५०-६० सी. सी. टी. व्ही. कॅमेरे चेक केले त्यामध्ये दोन इसम मोटार सायकल चोरी करून घेवुन गेल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपी बिड येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने देहुरोड तपास पथकाने आरोपी नामे अम्रत भाऊसाहेब देशमुख, वय ४६ वर्षे, राहणार मुक्कम कानापूर, सिरसाळा, तालुका . धारूर, जि. बीड २ फारूक शब्बीर शेख, वय ३७ वर्षे, राहनार मोहा रोड, सिरसाळा, तालुका परळी बीड यांना सिरसाळा, जिल्हा बीड येथुन सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड मिळुन त्यांचेकडे केलेल्या तपासात तसेच तांत्रीक तपासादरम्यान देहुरोड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, औरंगाबाद, घोडेगाव अहमदनगर येथुन चोरी केलेल्या ८,००,००० रुपये किंमतीच्या ११] मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. चोरी केलेल्या मोटार सायकलीपैकी ०६ मोटार सायकली आळंदी मरकळ रोड, लोणीकंद, करंदी, मोसे, चाकण, कुरळी परिसरातील वेगवेगळ्या मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवुन त्यांचेकडुन पैसे ट्रान्सफर करून घेवून पैसे परत घेवुन येतो असे सांगुन त्यांची फसवणुक केली आहे. अटक आरोपींकडुन देहुरोड पोलीस स्टेशनचे ३ गुन्हे, आळंदी पोलीस स्टेशनचे ०३ गुन्हे, सांगवी, हिंजवडी, क्रांतीचौक पोलिस स्टेशनं औरंगाबाद शहर, सोनई . अहमदनगर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणण्यात देहुरोड पोलीसांना यश आले आहे. उर्ववरीत ०१ मोटार सायकलबाबत देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त . संजय शिंदे,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ डॉ. काकासाहेब डोळे,. सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग . पद्याकर घनवट, पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन खाली सहायक पोलीस
निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे पोलीस अंमलदार बाळासाहेब विधाते, सुनिल
यादव
किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, निलेश जाधव, युवराज माने, सचिन शेजाळ
स्वप्नील साबळे, संतोष महाडीक यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.