पुणे : रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीस येरवडा पोलिसांनी केले जेरबंद. येरवडा तपास पथकाचे पोलीस गुन्ह्याचा तपास करीत असताना डीबी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की,सदर गुन्ह्यातील चोरून नेलेला मोबाईल हा संशयित तरुण, उमेश सहानी या तरुणाकडे असल्याचे समजले या तरुनाला पोलीस येत आहे हे समजताच, संशयित उमेश प्रेम सहानी.वय 18, राहणार. नागपूर चाळ पुणे.हात पळून जात असताना पोलिसांनी अत्यंत चिकाटीने आणि शिताफिने त्यास पकडले.त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तेवा त्याने सदरचि गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.त्यानुसार त्यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला 20,000 रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली टू व्हीलर मोटरसायकल, असा एकूण 1,38,000 रुपये किमतीचा मुद्देमा ल जप्त करण्यात आला.
कामगिरी ही . पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४. शशिकांत बोराटे , सहाय्यक पोलीस आयुक्त. येरवडा विभाग,किशोर जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा, बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे,यांच्या मार्गदर्शनाखाली,तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक . अंकुश डोंबाळे, . सहाय्यक पोलीस फौजदार ,प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, कैलास डुकरे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, , प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी व सुरज ओंबासे यांनी केलेली आहे..