पुणे (सतीश जाधव ) येत्या काळात आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने युनिट -४ कडील पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमल लदार, अजय गायकवाड व सारस साळवी यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, साईबाबा मंदीर, जुना पुणे-मुंबई हायवे रोडवर बोपोडी मेट्रो स्टेशन जवळ तीन इसम चोरी केलेले मोबाईल कमी किंमतीत विकत आहेत. बातमीचे अनुशंगाने पथकाने बातमीच्या ठिकाणी जावून त्यांना पकडले असता त्यांचेकडे एक स्कुटर मिळून आली, सदर स्कुटरची झडती घेतली असता त्याच्या डिकी मध्ये वेग वेगळया कंपनीचे एकूण १२ मोबाईल फोन व १ चाकु मिळून आला. त्यांना त्यांची नावे व पत्ते विचारल असता त्यांनी त्यांची नावे किशोर उत्तम गायकवाड, अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर, आशिष ऊर्फ बोना संतोष सोजवळ असे सांगितले. त्यांचेकडे सदरबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचे मोबाईल पुणे व पिंपरी-चिंचवड भागात तसेच पुणे-बेंगलोर हायवेवर रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या लोकांना चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडून जबरदस्तीने
हिसकावून चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता , त्यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार हे हॅरिस बिज जवळ बोपोडी येथे थांबलेले असून त्यांचेकडे देखील काही चोरीचे मोबाईल फोन आहेत असे सांगितले. सदर आरोपींना त्यांचेकडील मिळालेल्या मोबाईल फोन व स्कुटरसह हॅरिस बिजजवळ बोपोडी येथे नेले असता तेथे त्यांचे दोन साथीदार नामे जॉर्ज डॉनिक डिसोजा,साहील ऊर्फ साहील्या सलीम शेख असे असल्याचे सांगितले, त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात वेग-वेगळ्या कंपनीचे ८. मोबाईल फोन मिळुन आले, तसेच
त्यांचे ताब्यात एक मोटार सायकल मिळून आली. सदर दोन्ही वाहनाचा उपयोग ते रात्री एकटे जाणा-या
लोकांना अडवून त्यांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरी करण्यासाठी करत असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेले आरोपी किशोर उत्तम गायकवाड वय १९ वर्षे राहनार स.नं. २४. कमलाबाई बहीरट चाळ, बोपोडी, पुणे, अजय ऊर्फ ओमकार सुरेश गाडेकर, वय २१ वर्षे, राहनार . स.नं. २४. बोपोडी पुणे, आषिश ऊर्फ बोना संतोष सोजवळ, वय २४ वर्षे, राहनार स.नं. २४. सावंत नगरीजवळ, बोपोडी पुणे, जॉर्ज डॉम्निक डिसोजा, वय- १९ वर्षे, राहनार स.नं. २४, सम्राट अशोक नगर, पवळे चाळ, बोपोडी, पुणे, साहील ऊर्फ साहील्या सलीम शेख, बय- १९ वर्षे, रा.हनार इंदीरानगर वसाहत, घर नं.२. खडकी बाजार, खडकी, पुणे यांचेकडून एकुण २० मोबाईल फोन, ०१ धारदार चाकू तसेच गुन्हयात वापरलेली ०१ अॅक्टिव्हा स्कुटर, ०१ बजाज पल्सर गाडी असा एकुण रु. ४,१५,२०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.वरील आरोपीकडून आतापर्यंत चे मोबाईल चोरीच गुन्हे उघडकीस आणले आहे.खडकी, खडकी, खडकी, सांगवी, सांगवी,चतुर शिंगी, चतुरशिंगी, चतुर शिंगी, स्वारगेट सिहंगड, हिंजवडी, भारती विद्यापीठ या आरोपीकडून 11 मोबाईल आणि 1 जबरी घरफोडी उघडकीस आंनली हि कामगिरी पोलीस आयुक्त, रितेशकुमार, संदीप कर्णिक सह पोलीस आयुक्त, गुन्हे पोलीस उपायुक्त अमोल झेन्डे, सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर,युनिट 4 गुन्हे पोलीस निरीक्षक गणेश माने,यांच्या मार्गदर्शनखाली, सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव पोलीस अमलदार,अजय गायकवाड, प्रवीन भालचिम,संजय आढ री, विठ्ठल ओवाहल, पोलीस नाईक विनोद महाजन,स्वप्नील कांबळे,
वैभव रणपिसे,मनोज सांगळे, वैभव रणपिसे,अशोक शेलार, राठोड रमेश,महिला पोलीस वैषाली माकडी, शीतल शिंदे यांनी केली.