लोणावळा परीसर हा थंड हवेचे ठिकाण असल्याने परीसरात मोठया प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी, राहण्यासाठी येतात. काही पर्यटकांचे स्वतःची घरे आहेत,तर काही पर्यटक भाडेतत्वावर घरे घेवून राहतात. पर्यटकांचे तसेच स्थानिकांचे घरामध्ये चोरी होत असल्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचेशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उप विभागाची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. गुन्हे घडलेले ठिकाण, गुन्हयाची वेळ, गुन्हे करण्याची पद्धत याचा अभ्यास करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करन्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणावळा परिसरात आपला वावर वाढवून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास सुरू केला. उपलब्ध माहितीचे आधारे सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार १) वसीम सलाऊद्दीन चौधरी वय २७ वर्षे राहणार वाकसाई, वरसोली लोणावळा तालुका मावळ जिह्वा . पुणे हा असल्याची माहिती समोर आली त्यास तपासकामी ताब्यात घेवून तपास केला असता, त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी वसीम हा उघडया दरवाजावाटे, स्लायडींग खिड़की द्वारे, घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम मौल्यवान वस्तूंची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. चोरीचे काही गुन्हयात त्याचे साथीदार २) सलीम सलाऊद्दीन चौधरी वय २१ वर्षे राहणार लोणावळा तालुका मावळ जिह्वा पुणे ३) शहारूख बाबू शेख वय २१ वर्षे राहणार लोणावळा तालुका मावळ जिह्वा पुणे यांचा सहभाग असल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी कडून एक तोळा वजनाची सोन्याची चैन, दोन डायमंडच्या अंगठया, एक सोन्याची अंगठी, दोन मोटार सायकल, रोख रक्कम असा एकूण २,२६,७०० रूपय किमतीचा मुद्देमाल हस्तगत करन्यात आलेला असून आरोपी वसीम चौधरी हा सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून इतर दोन आरोपिंचा न्यायालयाने जामीन मंजूर केला असून आरोपी वसीम चौधरी या आरोपीवर यापूर्वी आठ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपीकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे लोणावळा शहर पोलिस स्टेशनं १) ३१७/२०२३ भादंवि ३८०, २) २१४ / २०२३ भादंवि ३८०, – ३) १६२ / २०२३ भादंवि ३८०, ४) २९३ / २०२३ भादंवि ३८०, ५) २३५/२०२३ भादंवि ३७९, ६) १७८ / २०२३ भादंवि ३७९. ७) २९८ / २०२३ भादंवि ३७९. ८)६७/२०२३ भादंवि ४५४, ३८०, ९) ७१ / २०२३ भादंवि ४५४,४५७,३८० लोणावळा ग्रामीण पोस्टे १०) ४४६ / २०२३ भादंवि ४५४, ४५७,३८० लोणावळा परीसरात राहणारे लोक तसेच येणारे पर्यटकांनी रात्रीचे वेळी तसेच फिरण्यासाठी बाहेर पडताना
आपआपले घरांचे दरवाजे-खिडक्या व्यवस्थीत लॉक करावेत. दरवाजा खिडकी उघडे ठेवून झोपू नये, तसेच स्लायडींग
खिडक्यांना लोखंडी ग्रिल लावावेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावणेबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल तसेच लोणावळा उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक सो यांनी आवाहन केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस शिपाई प्रदीप चौधरी, सहा फव्जदार प्रकाश वाघमारे, पोली स हवालदार राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, पोलिस नाईक बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, पोलिस कॉन्स्टेबल मंगेश भगत, प्राण येवले चासफी काशिनाथ राजापूरे, पोलिस हवालदार शकील शेख यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.
संपादक : सतीश जाधव.