पुणे ( महागर्जना प्रतिनिधी ) लोणीकंद पोलीस स्टेशन हदीतील भावडी तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन,लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणा-या दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणा-या सराईत गुन्हेगाराच्या,कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये,तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा.या उद्देशाने सदर इसमावर सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार, प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त, परिमंडळ- ४, पुणे, शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, त्यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे..
लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरा रामदास श्रीराम, वय ३५ वर्षे, राहणार भावडी तालुका हवेली, जिल्हा पुणे याचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३१९/२०१४. भा. दं.वि. कलम ३०७,३२५. ३२४१४३, १४७, १४८.३४२) गु.र.नं.३८८/२०२३.भा.दं.वि. कलम ३२४.५०४, १४३, १४७, १४८, १४९ ३)गु.र.नं. ३९० / २०२३, भा.दं.वि. कलम ३४५,३३६, ५०४,३४ अन्वये तीन दखलपात्र स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असुन, त्याच्या हालचाली या सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा झाल्या होत्या.आणि त्यासाठी त्याचेवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे झाले असल्याने . पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे त्याला संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४. शशिकांत बोराटे, . सहा. पोलीस आयुक्त संजय पाटील, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजित काइगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, रामकृष्ण दळवी, पोलीस अमलदार प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.
सदरचा तडीपार इसम हा पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास,त्याची माहीती लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्वजित काइ गडे यांनी केले आहे.