आजकाल शहरापारसून ते ग्रामीण भागात सुद्धा वाढते प्रदुषण, वेगवेगळ्या प्रकारचे आजार यांमुळे जवळपास दर 10 माणसांच्या मागे 2 ते 4 जण तरी असे आहेत जे नियमीत काहीना काही कारणामुळे गोळ्या औषध घेत असतात. धावत्या जीवनशैलीमुळे डोके दुखण, किंवा थोडासा ताप, सर्दी, खोकला याच्यासाठी आपण टिव्ही वरील जाहिराती बघुन किंवा काही ठराविक नेहमीच्या गोळ्या डॉक्टरांचा सल्ला न घेता घेत असतो. विशेष करुन गृहीणी डॉक्टरांकडे जाणे टाळतात. अनेकदा साध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र या सगळ्याचे गंभीर परिणाम कालांतराने जाणवायला सुरुवात होते. अनेक लोक असे पण आहेत ज्यांना प्रत्येक छोट्या- मोठ्या गोष्टींसाठी गोळ्या औषध घेण्याची सवय असते.
किडनीवर परिणाम
साधारण अनेकांना ही गोष्टी माहिती असेलच की वारंवार आपण गोळ्या औषध घेत असतो, त्याचा थेट किडनीवर परिणाम होत असतो. त्या-त्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेतलेल्या गोळ्या या क्षणीक आराम देतात. किडनीवर होणार परिणाम हा लगेच दिसून येत नाही. त्यामुळे अनेक जण या गोष्टी गांभीर्य़ाने घेत नाहीत. वारंवार पित्ताच्या गोळ्या सवय लावून घेऊ नये. सध्या पी पी आय ह्या गोळया सर्व साधारण पणे वापरात आहेत. पित्ताच्या समस्येवर ह्या उत्तम आहेत. पण जास्त काळ घेऊन शरीरात मॅग्नेशियम व इतर ची कमतरता होऊ शकते. याने स्नायूंना थकवा येतो. हैड्रो क्लोरिक आम्ल न तयार झाल्याने इतर वेगळ्या समस्या येऊ शकतात. अर्थात हे सर्व जास्त काळ गोळ्या घेतल्या तर होत.
सेस्क लाईफ
तरुण वयात प्रेमसंबंधात अनेक तरुण अपुर्ण माहितीच्या अभावी मेडीकलमधुन सेस्क टाईम वाढवण्यासाठी वॅग्रा किंवा यासारख्या गोळ्या घेतात. मात्र या सगळ्याचा त्यांच्या पुढच्या लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो. अनेकदा चुकीच्या पेन किलर घेतल्यामुळे पेशंटला गंभीर परिणाम भोगावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेकदा गोळ्या योग्य असल्या तरी वयोमानानुसार त्याची पावर कमी जास्त असते. अशावेळी गोळ्यांच्या रिअक्शन होतात, अनेकांना सुज येणे, अंगावर पुरळ उठणे, लाल डाग पडणे अशा समस्या उद्भवतात. कफसिरपमुळे सर्दी, खोकला बरा होतो, मात्र यामुळे झोप जास्त येते, सुस्ती चढते. कफसिरफच्या अति सेवनाने दृष्टी कमजोर होण्याचा धोका ही संभवू शकतो.