रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली चालू आयपीएल हंगामानंतर कर्णधारपद सोडणार
दिल्ली : इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी सुरुवात झाली.दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच एक मोठी बातमी समोर येत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली चालू आयपीएल हंगामानंतर कर्णधारपद सोडणार आहे.आरसीबीने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली आहे.
विराट म्हणाला, ”गेली काही वर्षे मी खूप क्रिकेट खेळत होतो. मला स्वतःला ताजेतवाने करायचे होते. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. मी आरसीबी व्यवस्थापनाला हे कळवले आहे की मी संघाशी संबंधित असेल. माझा संघासह ९ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास आहे. मी या फ्रेंचायझीसाठी खेळत राहीन. सर्व चाहत्यांचे आभार. हा एक छोटासा स्टॉप आहे. हा प्रवास यापुढेही सुरू राहील. आरसीबी एका बदलातून जात आहे. कारण पुढच्या वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे. मी व्यवस्थापनाला सांगितले आहे, की मी आरसीबी व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघात असण्याचा विचारही करू शकत नाही.”