दि. १०/११/२०२४ रोजी घरी असताना ते त्यांचे स्वःचे इन्स्टाग्राम अकाउंट बघत होते. त्यावेळी त्यांना ब्लॉक ट्रेडींग संदर्भात जाहीरात दिसली होती. शेअर मार्केट मध्ये त्यांना आवड असल्याने त्यांनी सदर जाहीरातीवर क्लिक केले असता त्यांना M503 Geojit Financial Services Ltd या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करुन घेण्यात आले होते. सदर ग्रुपमधील ग्रुप अॅडमिन Radhakrishnan Nair, Aishwary Shastri Geojit यांनी फिर्यादी यांना त्यांची M503 Geojit Financial Services Ltd ही कंपनी असुन त्या कंपनी मार्फत ब्लॉक ट्रेडींग आणि आयपीओ ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुक केली तर प्रत्येक दिवसाला १० ते १२ टक्के प्रॉफिट होईल असे सांगुन फिर्यादी यांची ७६.११,७००/- रु ची गुंतवणुक करयाला लावुन कोणत्याही प्रकारे परतावा दिला नाही. म्हणून सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं ०१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८ (४), ३(५) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (सी), ६६ (डी), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्हयासाठी वापरले ल्या बैंक अकाऊंटपैकी ०२ बैंक अकाऊंट हे नांदेड सिटी, पुणे येथील असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरठिकाणी पोउपनि सागर पोमण व स्टाफने जावून सदर इसमाकडे चौकशी करता त्याने सदरचे बैंक अंकाउट हे आरोपी नामे शुमम सोरटे यांचे सांगणेकवरुन काढले असुन सदर अंकाउट हे संपुर्ण किटसह आरोपी शुभम याचेकडे दिले असल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक तपास करता आरोपी शुभम सोरटे याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता सदरचा आरोपी हा नांदेड सिटी परिसरातच असल्याची माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कैशल्यपुर्वक तपास केला असता त्याने अदित्य इंगळे रा. जय भवानी नगर, म्हाडा रोड, भोकरदन, ता. भोकरदन जि.जालना. यांच्यासोबत सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगीतले. त्यानंतर आदित्य इंगळे यांचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला असता तो ता. भोकरदन जि.जालना येथे असल्याची माहीती मिळाल्याने तात्काळ पोउपनि सागर पौमण व स्टाफ वरीष्ठांच्या परवानगीने रवाना होऊन आदित्य इंगळे यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास व शुभम सोरटे यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी शुभम सोरटे व आदित्य इंगळे हे जालना, पुणे शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या इसमामार्फत बैंक अंकाउट काढून सदर अंकाउटची माहिती सायबर गुन्हेगार यांना देवुन व त्यांचेशी संगणमत करुन फसवणुक करत होते. दाखल गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करणे, त्याचेकडे गुन्हा करण्यासाठी वापरलेले बैंक अकाउंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार, त्यांचेकडे मिळून आलेले
मुद्देमालाबाबत, त्यांचा अशा प्रकारे किती गुन्हयामध्ये सहभाग आहे, इत्यादीबाबत तपास चालु आहे. रविकिरण नाळे, पोलीस निरिक्षक सायबर सेल अधिक तपास करत आहेत.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, . वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि, प्रविण स्वामी, पोउपनि, सागर पोमण, पोउनि, वैभव पाटील, पोउनि, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, अनिकेत टेमगीरे, विशाल निचित, भाविका प्रधान, दिपाली चव्हाण सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
नागरीकांना आवाहन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करणेसाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशनचा वापर करावा, शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कत अॅप्लीकेशन हे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफार्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी, कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बैंक अकाने वैयक्तीक माहीती शेअर करु नये.