युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर
सोन्याचे दुकान लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट पाचने केली अटक
दि. ८ रोजी बोराटे वस्ती बी.टी. कवडे रोड घोरपडी, मुंढवा या ठीकानि फिर्यादी हे दुकानामध्ये हिशोब करीत बसले असताना, अनोळखी वेक्तीने दुकानाचे शटर अर्धे खाली ओढुन फिर्यादी यांना पिस्तुलचा धाक दाखवुन त्यांचे तोंडावर कोणतातरी स्प्रे मारुन, फिर्यादी यांना लोखंडी हत्याराने मारहाण करुन दुकानातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेल् असल्याने त्याबाबत फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्या ने मुंढवा पोलीस स्टेशनयेथे गुन्हा भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०९ (६), ३ (५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ या कलमानुसार गुन्हा दाखल करन्यात आलेला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट ५ पथकाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्हा केलेल्या अनोळखी आरोपींनी
ओळख पटण्याच्या दृष्टीने कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. गुन्हे शाखा युनिट ५ पथक यांचेकडुन आरोपीची शोध मोहिम सुरु होती अनोळखी आरोपींनी त्यांची ओळख पटू नये किंवा त्यांचा शोध लागु नये या हेतुने गुन्हा केल्यानंतर त्यांचे अंगावरील जर्कीन बदलले होते.
दि.२१ रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीदाराकडुन तसेच पडताळणी करण्यात आलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन हा गुन्हा इसम नामे मनोज सुर्यवंशी राहणार धा यरी पुणे याने त्याचे साथिदारांसह मिळुन केला असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने लगेच पोलीस स्टाफसह सदर इसमाची माहिती काढुन त्याचे प्राप्त पत्यावर समक्ष जावुन त्याचा शोध घेतला असता, नमुद इसम त्याचे राहते घरी मिळुन आल्याने त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मनोज ऊर्फ मन्या तुकाराम सुर्यवंशी वय २३ वर्षे, राहणार . येप्रे बिल्डींग पहिला मजला, मारुती मंदीर जवळ, धायरी फाटा पुणे असे असल्याचे सांगितले. नमुद इसमाकडे अधिक तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर २ साथिदारांसह केला असल्याचे कबुल केले.व तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहिसाठी मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ५ चे
पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलीस निरीक्षक , विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार प्रमोद गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, उमाकांत स्वामी, सैदोबा मोजराव, शुभम शेख, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे, पल्लवी मोरे, स्वाती गावडे, अमित म्हाळसेकर, अमित कांबळे, देसाई, राजस कांबळे, यांनी कामगिरी केली.