पुणे : सतीश जाधव
. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी पोलीस आयुक्तालय हददीतील अवैध शस्त्रे बाळगणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करून तसेच गोपनीय माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश केल्याने, दि. 6 रोजी हिंजवडी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील सहा. पोलीस निरीक्षक . सोमनाथ पांचाळ, पोलीस हवालदार गिलबिले, पोलीस हवा. केंगले, पोलीस शिपाई रवी पवार,असे हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रे शोध व कारवाईकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई रवी पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मेघा 9 हॉटेल जवळ हिंजवडी येथे एक काळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक जण कमरेला पिस्टल लावुन फॅशन मोटरसायकलवरुन फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी सदर बातमीचा आशय लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांना कळवुन त्यांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाने बातमीप्रमाणे सापळा रचून मेघा 9 हॉटेल जवळ इसम नामे विकी दिपक चव्हाण वय 19 वर्षे रा. सोन्या केसवड यांची खोली, धुमाळवाडी, घोटावडे, ता. मुळशी यांस . शिताफीने ताब्यात घेवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे मागील बाजुस खोचलेले 2 गावठी लोखंडी पिस्टल व पँटचे खिशा मध्ये 4 राऊंड मिळून आल्याने त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी हा शरद मोहोळ टोळीशी संबंधित असल्याचा अंदाजआहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे करीत आहेत.
सध्याची कारवाई विनयकुमार चौबे , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, , वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त 2, पिंपरी चिंचवड, सुनील कु-हाडे सहाय्यक. पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषिकेश घाडगे, मुख्य सहाय्यक निरीक्षक सोमनाथ पांचाळ, संवर्गातील पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस आयुक्त नरेश बलसाने, कैलास केंगले, मधुकर कोळी, प्रशांत गिलबिले, विजय गेंगजे, रवी पवार, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, आदींनी कारवाई केली.