पुणे ( महागर्जना प्रतिनिधी ) हॉटेल मालकाच्या खून प्रकरणी आरोपीना सिहंगड पोलिसांनी केले ३६ तासात जेरबंद.
दिनांक २९.०९.२०२३ रोजी दावत हॉटेलचे मागील बाजुस असलेल्या गल्लीतील क्वालीटी इन लॉजचे पार्किंग जागेत, वडगाव बुद्रुक पुणे येथे इसम नामे विजय वसंत दुमे वय ४४ वर्ष, रा. मेट्रोपोलीटियन आय बिल्डींग, फ्लॅट क्रमांक ९०४ लिंकरोड, दर्शन हॉलजवळ, चिंचवड गाव, तानाजीनगर, पुणे यास ४ ते ५ अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून त्याचे डोक्यात लोखंडी जाड़ सळईनी,व लाकडी दांडक्याने,जबर मारहाण करुन, त्यास गंभीर जखमी करून, त्याचा खुन केला होता.त्या बाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजिन ४६४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गणपती विसर्जन मिरवणुकी नंतर घडला असल्याने वरिष्ठांनी गुन्ह्यातील अनोळखी इसमाचा शोध घेणेबाबत योग्य त्या सुचना दिल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, जयंत राजुरकर,पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, सचिन निकम व पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी यांना योग्य त्या सुचना देवून तपास पथकाचे दोन टिम अनोळखी इसमाचा शोध घेण्यासाठी रवाना केल्या होत्या.
सदर गुन्ह्यातील अनोळखी तरुणचा मागोवा घेत परिसरातील विविध ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करीत असताना अनोळखीचा इसमाचा कोणाताही सुगावा मिळत नसताना, नमुद गुन्ह्यातील आरोपी हे घटना घडण्यापुर्वी व घटना घडल्यानंतर संशईत आरोपींचा ६० ते ७० सी.सी. टि.व्ही फुटेजचे आधारे माग घेतला, व सदरचे प्राप्त सी.सी.टि.व्ही. फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीची नावे निष्पन्न केली होती. तसेच मयत इसमाचे जुने प्रेमसंबध असणारी महिला सुजाता समीर ढमाल रा किरकिटवाडी, नांदोशी रोड, पुणे हिचेकडे देखील सखोल तपास करण्यात आला असता, तान्त्रिक विष्लेषणात प्राप्त झालेली संशय तांची नावे व महिलेकडे केलेल्या तपासात मिळालेले धागेदोरे याआधारे सदर महिलेनेच तिच्या नवीन प्रियकर नामे संदिप दशरथ तुपे, वय २७ वर्षे रा.मु पो. कांदलगाव, ता. इंदापुर जि.पुणे याचे मार्फत तिचा जुना प्रियकर मयत विजय दुमे याला संपविण्याचा कट केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर महिलेस व तिच्या नवीन प्रियकर संदिप दशरथ तुपे, यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यानी सदरचा खुन हा त्याचे ओळखीचे इत्तर ५ साथीदाराचे मदतीने घडवुन आणल्याचे कबुल केले, त्याआधारे आरोपीचे इतर साथीदार सागर संजय तुपसुंदर वय १९ वर्षे रा. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या मागे महात्मा फुले सोसायटी घर नं १०२५ सहकारनगर नंबर पुणे, प्रथमेश रामदास खंदारे वय १८ वर्षे रा. आवेकर हॉटेल जवळ उंड्री पिसोळी पुणे व त्याचा एक विधीसंघर्षित साथीदार यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असून, त्याचे इतर साथीदारांचा शोध चालु आहे. गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे..
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता आरोपी नामे संदिप दशरथ तुपे वय २७ वर्षे रा.मु पो. कांदलगाव, ता. इंदापुर जि. पुणे. याचे विरुध्द पुढीलमाणे गुन्हा दाखल आहे. १) टेभुर्णी पो.ठाणे गुरजी न. १३४/२०२२ मादविक ३०७, ३९५, ३९७, ३४१,३२६,३४, १२० व व आर्म अॅकट ४/२५ २) इंदापुर पो. ठाणे गुरजी. न. ५६/२०१६ भादविक १४३, १४७, १४८, १४९. ३२६ वगैरे ३) हिजवडी पो.ठाणे गु.र.न. १३६ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी . पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे . प्रविणकुमार पाटील,. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३. पुणे . सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग आप्पासाहेब शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी, सहा पोलीस फौजदार आबा उतेकर, सतिश नागुल, सुनिल चिखले, पोलीस अंमलदार संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील यांचे पथकाने केली आहे.