येरवडा :भागात दि. ३१/०८/२०२३ रोजी पहाटेचे सुमारास फिर्यादी रात्रीचे वेळी घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे दरवाजाची कडी उचकटून आतमध्ये प्रवेश करुन घरातील ९८५०/- रु किं.चा मुद्देमाल चोरी करुन घेवून गेले आहेत म्हणून येरवडा पो. स्टे. गु. र. नं. ५९७ / २०२३ भादवि ४५४ ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा पर्णकुटी येरवडा भागात येणार आहे.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरून कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोउपनि अंकुश डोंबाळे, व स्टाफ यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता सिध्देश मुकेश शेंडगे वय १८ वर्षे रा स नं १२ लक्ष्मीनगर येरवडा पुणे व एक विधीसंघर्षित बालक असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी करता त्याने चोरी केल्याचे कबूल करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस दि.३१/०८/२०२३ रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला ५,०००/- रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व ८५०/- रु. रोख ५००/- रु बन्नेकलेस असा एकूण ६,३५०/- रु. कि. या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-४ श्री. शशिकांत बोराटे, मा.सहा. पोलीस आयुक्त, पेरवडा विभाग श्री संजय पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती कांचन जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे पोलीस अंमलदार गणपत को दत्ता शिंदे, तुषार खराडे मिलिद निदाळकर, किरण, गुटे अमजद शेख सागर जगदाळे कैलास करे प्रविण खोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी. राजा भोसले यांनी केलेली आहे.