दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे वाहनचोरी प्रतिबंधच्या अनुषंगाने खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान स्टाफ मधील पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा पारगे चौक मंगळवार पेठ जवळील आर्शिवाद बिल्डींगचे समोर रोडवर बाहेर पुणे येथे उभा असुन त्याचेजवळ असलेल्या बजाज पल्सर मोटार सायकल काळया रंगाची, लाल पटयाची मोटारसायकल ही चोरीची आहे,अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. बातमी ही वरिष्ट पोलीस अधिकारी अशोक इंदलकर यांना कळविली असता त्यांनी बातमीची खातरजमा करुन कारवाई करणेबाबत आदेशि केले होते.
प्राप्त बातमीचे अनुषंगाने इकडील अधिकारी व अंमलदार हे वरील ठिकाणी जावुन पाहणी केली असता बातमीतील वर नमुद वर्णनाचा एक इसम मोटार सायकलसह मिळुन आल्याने त्यास जागीच ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन सिध्दाराम चौगुले वय २३ वर्षे राहणार ओम ब्लड बैंक हनुमान मंदीर मंगळवार पेठ पुणे व मुळ गाव संगमेश्वर गल्ली मैंदर्गी सोलापुर असे असल्याचे सांगीतले. सदर मोटार सायकलबाबत त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही साधारण ४ दिवसापुर्वी लेन नं १५, प्रभात रोड, शौनक बिल्डींगचे समोरील रोडवरुन चोरली आसल्याचे सांगीतले. त्याचेकडुन डेक्कन पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं १५३ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असुन त्याचेकडुन किं रु १,००,००० ची एक बजाज कंपनीची १५० पल्सर मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच पुढील कारवाईकरीता डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे . सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे व आजीनाथ येडे व नारायण बनकर यांनी केली आहे.
संपादक:सतीश जाधव