पुणे : (सतीश जाधव ) सातारा येथील शैक्षणिक संस्थेची यापुर्वीच विक्री झाली असताना, पुणे अरण्येश्वर येथे राहणारे फिर्यादी यांना सन २०२१-२२ दरम्यान सदर संस्था विकत घ्यावयाची आहे असे सांगुन त्यांचा विश्वास संपादन करुन गुंतवणुकीवर ७० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सदर शिक्षण संस्थेचा तावा स्वतःकडेच आहे असे भासवून त्याबाबतची बनावट कागदपत्रे सादर करुन फिर्यादी यांना आजतागायत कोणताही मोबदला अगर मुद्दल परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे.
सदरबाबत फिर्यादी यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दि. २०/०७/२०२३ रोजी तक्रार
दिल्याने गुरनं १७५ / २०२३ भादवि कलम ४०६ ४२०,४०९, ५०६, ५०४, १२०(ब) ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाची व्याप्ती व स्वरुप गोठया प्रमाणात असल्याने वरिष्ठांनी दाखल गुन्हयाचा तपास गुन्हेशाखा युनिट-२ कडे वर्ग केला होता. त्याअनुषंगाने युनिट-२ प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते यांचे पथकाने दि.११/०९/२०२३ रोजी गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे डॉ. संजोग महादेव देशमुख वय २८ वर्ष राहणार शिवाजी पार्क जिल्हा कोल्हापुर मुळ रा. शिंदेवाडी रोड, तालुका . खटाव जिल्हा .सातारा यास कोल्हापुर येथून शिताफीने अटक केली आहे.
आरोपी नामे डॉ. संजोग महादेव देशमुख यास आज दि. १२/०९/२०२३ रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दि. १५/०९/२०२३ पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. त्याअनुषंगाने गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशाखा युनिट-र प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक विशाल मोहिते हे करीत आहेत.
सदरची कामगिरी . पोलीस आयुक्त पुणे शहर रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त . संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, . रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, . सहा पोलीस आयुक्त, गुन्हे – ०१ . सुनिल तांब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, .नंदकुमार बिडवई, सहा. पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अंमलदार, उज्वल मोकाशी, गणेश थोरात, विजय पवार यांनी केली आहे.
संपादक : सतीश जाधव.