पुणे : (सतीश जाधव) , दिनांक १२/०९/२०२३ रोजी सुमारे ०७ वाजता . हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील ताथवडे येथिल एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे झेन गाडी मधुन आलेल्या तीन इसमांनी अपहरण केले असले बाबत पोलिस हवालदार मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाल्याने व सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने . पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आम्ही स्वतः गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे आणि सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार दार यांना तात्काळ घटनास्थळी जावुन तपास करण्याचे आदेश दिले होते… त्याअनुषागाने गुन्हे शाखा युनिट-४ चे सर्व पोलीस अधिकारी व अंम लदार यांनी मुलाचे अपहरण केले ठिकाणाचे
सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात तीन इसम हे एका निळया रंगाचे डोन गाडी मध्ये अपहरण केलेल्या
मुलास घेवुन जात असल्याचे दिसत होते. त्याच दरम्यान गुन्हे शाखा युनिट-४ ने अपहरण केलेल्या मुलाचे काका यास
ताब्यात घेवुन त्याचे कडे चौकशी करून त्याचे कडुन माहिती काढण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान सदर अपहरण
झालेल्या मुलांच्या काकास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांका वरून फोन करुन एका इसमाने “३० लाख रुपयाची खंडणी दे
नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडुन त्यास मारुन टाकतो” अशा प्रकारचा खंडणीचा फोन करत होते. तेव्हा अपहरण करणान्या इसमां बाबत मिळालेल्या बातमीदारा कडुन व पोलिस शिपाई प्रशांत सैद यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणा वरुन अपहरण करणारे इसम है सासवड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने आम्ही लागलीय सपोनि देशमुख, दरोडा विरोधी पथक व पोउपनि रायकर, गुन्हे शाखा युनिट-४ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सदर ठिकाणी रवाना केली. तसेच त्यादरम्यान आम्ही वपोनि शंकर आवताडे यांनी पोलीस उप अधिक्षक बरडे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे यांचे पोनि अविनाश शिळीमकर, सासवड पो ठाण्याचे मोनि जाधव, राजगड पो ठाण्याचे पोनि आण्णा घोलप यांना देखिल संपर्क करुन त्यांना सविस्तर प्रकार सांगुन आरोपीचे वर्णन सांगुन तात्काळ नाकाबंदी लावण्यास सांगितले. त्यांनतर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे व सासवड पोलीस ठाणे यांनी योग्य तो समन्वय साधुन तात्काळ प्रतिसाद दिल्याने आवघ्या अडीच तासात सापळा लावुन आरोपी नामे १) तेजस ज्ञानोबा लोखंडे, वय-२१ वर्षे, रा. दत्त मंदिर शेजारी, मारुजीगाव, पुणे २) अर्जुन सुरेश राठोड, वय- १९ वर्षे, रा.दत्त मंदिर शेजारी, मारुजीगाव, पुणे ३) विकास संजय मस्के, वय-२२ वर्षे, रा. शिवार वस्ती, भुमकर चौक, पुणे. या खंडणीखोर तीन आरोपींना शिताफीने झेन गाडीसह ताब्यात घेवुन त्यांचे तावडीतून अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात यश मिळाले. आहे.
तसेच सदर आरोपींकडे मिळुन आलेल्या गाडीची पाहणी केली असता त्यात तीन मोबाईल फोन, ०१ छन्ऱ्याचे पिस्टल, ०१ अडीच फुट लांबीचा कोयता, ०१ सुरा, छन्नी हातोडा, ०२ मास्क असा मुद्देमाल जप्त केला असुन त्यांचे कड़े प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपी यांनी अपहरण केलेल्या गुलाचे वडीलांबाबत माहिती काढली होती की त्याचा भंगाराचा व्यवसाय असुन त्याचे कडे खुप पैसे आहेत त्याचे गुलाचे अपहरण केले तर खुप पैसे मिळु शकता त्यासाठी त्यांनी पाच दिवस सदर मुलाचे अपहरण करण्यासाठी रेखी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यानी सदर मुलाचे अपहरण केले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. तसेच सदर आरोपींनी खंडणी मागण्याकरिता वापरलेले मोबाईल फोन है भुमकर चौक व मारुजी परिसरातुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर आरोपींना पुढील तपासकामी हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- १०६६/२०२३ भा.दं.वि. कलम ३६४ (अ) या गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी , पोलीस उप आयुक्त, काकासाहेब डोळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे सतिष माने, यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, सहा पोलीस निरीक्षक , अवरिष देशमुख, दरोडा विरोधी पथक, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, पोहवा प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पोना पासुदेव गुंडे, सुरेश जायभाये, पोशि प्रशांत संद, सुखदेव गावडे तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.
संपादक : सतीश जाधव.