पुणे (महागर्जना प्रतिनिधी) दिनांक १४ रोजी पहाटे सुमारास शंकरशेठ रोड, सेव्हन लव चौक जवळील मुख्य रस्त्यावर फिर्यादी हे मित्राच्या आईवडीलांना घेण्यासाठी त्यांची कार ने जात असताना ऑटो रिक्षास पाठीमागुन धडकल्याने सदरवेळी रिक्षा चालक व फिर्यादी यांच्यात वाद चालु झाले. त्यावेळी सदर ठिकाणी एका दुचाकी गाडीवरुन तिघे अनोळखी इसम आले. यांनी आपसांत संगनमत करुन फिर्यादी यांना धाक दाखवुन झटापट करुन फिर्यादी यांचे खिशातील रोख रक्क्म २०,००० व १५,००० रुपये किंमतीचा मोबाइल हॅण्डसेट व कारची चावी असा ऐवज जबरदस्तीने चोरी करुन ते सर्व जण पळुन गेले. घडल्या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेल्या तक्ररीवरुन खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३०७/२०२३ भा.द.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
घडलेला गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांचे तपास पथक नेमण्यात आले. फिर्यादी यांचेकडे अधिक सखोल चौकशी करुन केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे नमुद गुन्हयातील आरोपी रिक्षाचालक नामे रविंद्र मधुकर ढावरे वय ४५ वर्षे, यास शिवाजी आखाडा, जुना बाजार, २२६ मंगळवार पेठ, काची मळा येथून ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.
उर्वरीत तीन अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी शंकरशेठ रोड, सेव्हन लव चौक, नेहरु रोड या परिसरातील जवळपास ४० ते ५० सी.सी.टि.व्हि.कॅमेरांची पाहणी केली असता सदर तीन आरोपी हे स्थानिक असल्याची खात्री झाली. त्यानंतर तपास पथकातील अंमलदार संदीप तळेकर, सागर घाडगे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत सदर तीन अनोळखी इसम हे भिमाले संकुल येथील पार्किंग येथे आले असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी स्टाफसह जावुन सापळा रचुन नामे प्रथमेश उर्फ पत्या प्रमोद कांबळे, वय २३ वर्षे, राहणार म्हसोबा मंदिर जवळ, कासेवाडी पुणे,विशाल शंकर कसब, वय २३ वर्षे, रा. कासेवाडी पोलीस चौकी जवळ, कासेवाडी पुणे, सुशिल राजु मोरे वय २० वर्षे, राहणार . १० नंबर कॉलनी, कासेवाडी पुणे यांना ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आले..
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडुन गुन्हयात जबरी चोरी करुन नेलेला १५,००० रुपये किंमतीचा मोबाइल हॅण्डसेट व ५००० रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच गुन्हा करताना वापरलेली दुचाकी व रिक्षा ही वाहने तपासकामी जप्त करण्यात आली. पुढिल तपास सहायक पोलीस निरिक्षक, हणुमंत काळे हे करीत आहेत.
नमुद सर्व कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ संदिपसिंह गिल, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संपतरावं राउत, तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, . राकेश जाधव, हणुमंत काळे तसेच पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप तळेकर, सागर घाडगे, मंगेश गायकवाड़, रफिक नदाफ, सागर कुडले, अक्षयकुमार वाबळे, विशाल जाधव, लखन ढावरे, योगेश चंदेल, टेम्भूरने यांच्या पथकाने केली आहे.