पिंपरी चिंचवड (महागर्जना प्रतिनिधी ) थेरगाव परीसरातील इसम नाम दिनेश दशरथ काळे, वय २६ वर्ष, एकता कॉलनी, बेरगाव, पुणे हा मागील ६ महिन्यांपासून मिसिंग असलेबाबत त्याची आई नामे माथा दशरथ कांबळे, व ५० वर्षे, राहणार एकता कॉलनी, बापूजी बुवा नगर पुणे यांचे तक्रारीवरून वाकड पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग २६८/२०२३ प्रमाणे मिसीग दाखल करण्यात आली. थेरगाव,
एक तरुण ६ महीन्यापूर्वी मिसिंग झाला असून त्याचे हरविले तारीख व पोलीस ठाण मध्ये तक्रार दिलेली तारीख यामध्ये
मोठी तफावत असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे
अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सहा पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उप निरीक्षक सचिन चाण यांना सोबतचे पोलीस अंमलदारांसोबत मिसींग
व्यक्तीचा सर्वोतोपरी शोध घेणेबाबत आदेश दिले.
त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार मिसीगचा शोध घेत असताना मिसींग व्यक्तीच आई वडील यांचकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, त्यांचा मुलगा दिनेश कांबळे हा कोणताही कामधंदा करीत नव्हता तसेच यापूर्वीही तो तीन ते चार वेळा १० ते १५ दिवसात त्याचे मित्र परीवाराकडे राहणेस जावून परत आला होता. मात्र यावेळी त्याने घरातील त्याचे वडीलांची सोन्याची चैन न सांगता घेवुन गेला होता त्यामुळे त्याचे आईने त्याचा जाब विचारला असता दोन दिवसामध्ये चैन परत आणतो असे सांगुन तो घरातुन निघून गेला होता. तो अदयाप परत लाच नाही.
मग व्यक्तीचा शोध की ते रहात असलेले धरगाव परीसरात बातमीदाराकडून माहीती प्राप्त करून मिसोग व्यक्ती दिनेश कांबळे याचा मित्र ज्ञानेश्वर विभीषण मोटे व श्रवण ज्ञानेश्वर मोटे दोघे रा. अशोका सोसायटी, रुम नं. २१, थेरगाव, पुणे यांचेकडे चौकशी केली असता माहीती मिळाली की, दिनांक १५ रोजी रात्री ९:३० वा. चे सुमारास काळेवाडी फाटा शेजारील ग्राऊंडवर दिनेश कांबळे हा त्याचे मित्र सिद्धांत रतन पाचपिडे व प्रतिक रमेश सरवदे यांचेसह दारू प्यायला बसला होता त्यावेळी त्यामध्ये भांडण झाले असल्याची माहिती त्याला मिळाली होती. परंतु दिनेश सध्या कुठे आहे याबाबत त्याला माहीती नाही. त्यामुळे इसम नामे सिध्यति रतन पाचपिंडे, वय २३ वर्ष, राहणार गुरुनानक नगर कॉलनी नंबर ३, रहाटणी, पुणे व,प्रतिक रमेश सरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी कुदळवाडी, चिखली, पुणे यांना तपासाद्वारे ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, दिनांक १५/०३/२०२३ रोजी रात्री दिनेश काळे हा त्यांचे सोबत होता. त्या तिघांनी सुरवातीस पिपरी मध्ये दारू पिली त्यानंतर ते तिथे अॅक्सेस मोपेड वरून काळेवाडी फाटा येथे आले तेथे असणार मोकळे मैदानात पुन्हा दारु पिणे बसले होते. त्यावेळी दिनेश कांबळे याने प्रतिक सरवदे याचे पत्नीचावत अश्लिल भाषा वापरण्यास सुरुवात केले त्यात भांडण सुरु झाले. भागात प्रतिक रमेश सरवदे व सिद्धांत रतन पाचपडे याना दिनेश याचे डोक्यात सिमेंटचा मारून त्यास जखमी केले व तेथून निघून गेले परंतु काही वेळाने ते दोघेही रात्री ११.०० वा. सुमा पुन्हा माघारी आले व जखमी दिनेश बास अॅक्सेस मोपेडवर मध्ये बसवुन नंतर दापोडी येथे घेवुन जावून दि. १६/०३/२०२३ रोजी ०२.१५ वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई रोडवर मेट्रो पोल नंबर एन. पी. ९ जवळ, कासारवाडी, पुणे येथे नाशिक फाटा ब्रिज दरम्यान दिनेश कांबळे याला खाली फेकून देवून त्याचा खुन केला असे सांगीतले, दिनेश कांबळे यास ब्रिजवरून खाली फेकुन दिल्याने तो जागीच मयत झाला. दिनेश कांबळे हा जुना पुणे मुंबई रोडवर मरत अवस्थेत मिळून आला परंतु त्याचे अंगावर स्पाची ओळख पटविणेबाबतचा कोणताच पुरावा नसल्यानं बे वारस व्यक्तीचा अपघात वाचत भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर २२६ / २०२३ भादवि कलम ३०४(अ), २७९, – १८४,१३२(१) (सी), १९९, १७७, १३४(५) १३४ (बी) प्रमाण दिनांक १६/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करणेत आला आहे.
त्यामुळे सिद्धांत रतन पाचपिंडे वय २३ वर्षे, रा. गुरुनानक नगर कॉलनी नं. ०३ रहाटणी, पूर्ण व, प्रतिक रमेश सरवदे, वय २५ वर्षे, रा. विद्यार्थी विचार प्रशाळा, भैरवनाथ मंदिराशेजारी कुदळवाडी, चिखली, पुणे यांना ताब्यात घेवून भोसरी पोलीस स्टेशनचे गुन्हयामध्ये मनुष्यवधाचा प्रकार असल्याचे व आरोपी निष्पन्न झालेबाबत रिपोर्ट सादर करून आरोपी ताब्यात देणेत आले आहेत. सदरबा बत पुढील तपास भोसरी पोलीस स्टेशन करीत आहे. वा कड पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी
अमलदार यानी मिसिंग तक्रार दाखल झाल्यापासून दिवस-रात्र अथक परिश्रम करुन ३६ तासात सदर प्रकरणाचा उलघडा केला आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे,सह पोलीस आयुक्त . वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, . डॉ. काकासाहेब डोळे,पोलीस उप आयुक्त, परि-२ पिपरी चिंचवड . विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, विभाग, पिपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली . गणेश जादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो. बाबाजान इनामदार, सपोफो राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे पोहवा. संदीप गवारी पोहवा. स्वप्निल खेतले पो दिपक साबळे, पोहा अतिश जाधव, पोहवा. प्रमाद कदम, पोना प्रशांत गिलवीले पाना अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पाना, राम तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि कति खराडे, पोशि रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.