- पुणे (महागर्जना प्रतिनिधी) दि. १रोजी व दिनांक ०२/०९/२०२३ रोजीचे सकाळी फिर्यादी यांचे संतोषनगर लेन नंबर ७, डिलाईट बेकरीच्या शेजारी विजय लक्ष्मी मोटर्स या गॅरेजच्या कंपाउंड ट्रक क्रमांक मधील दोन बॅट-या कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्या त्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिन ५७६ / २०२३ भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत मिक्सर ट्रक व बस मधील बॅट-या चोरीचे प्रमाण वाढल्या मुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक,. विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे वर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, अभिनय चौधरी यांना सदरचा गुन्हा तुषार संजय धनावडे, वय २७ वर्षे, राहणार . मुळ भिलारेवाडी, ग्रामपंचायत ऑफिस समोर, ता. हवेली, जि. पुणे सध्या राहणार फ्लॅट नंबर १६, ४ था मजला, शारदा निकेतन सोसायटी, बेनकर वस्ती, धायरी, पुणे या इसमाने केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीचा शोध घेतला असता तो भिलारेवाडी, चामुंडा माता मंदीराचे समोरील रोडवर मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५७६ / २०२३ भादंवि कलम ३८० या गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे..
आरोपी तुषार संजय धनावडे याचेकडे अटके दरम्यान तपास केला असता त्याने मागील दोन वर्षापासून कात्रज, भिलारेवाडी, मांगडेवाडी भागातील मिक्सर, ट्रक बसच्या बॅट-या रात्रीच्या वेळी चोरी केल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन एकुण १,७५,००० रुपयांचा १३ महागड्या बॅट-या जप्त करण्यात आल्या असुन आरोपी कडुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी . अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, शैलेश साठे, मंगेश पवार, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.