पुणे ( महागर्जना प्रतिनिधी ) रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी अगामी काळात साजरा होणा-या गणेश उत्सव,व ईद ए मिलाद सर्वांच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये कोम्बींग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, तसेच हॉटेल,लॉजेस, ढाबे, एस. टी. व बस स्थानके, रेल्वे स्टेशन, तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत इसम,घटना इत्यादी कसून तपासणी करणे बाबत आदेश दिले होते. तसेच नाकाबंदी चेकींग राबवुन संशयित वाहन चालकांना चेक करणे बाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पुणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामधे गुन्हे शाखा व पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करुन पुणे शहरातील वेगवेगळ्या परीसरात दिनांक १६/०९/२०२३ रोजी रात्रौ २२.०० ते दिनांक १७/०९/२०२३ रोजी ०२:०० वा. पर्यंत कोम्बींग ऑपरेशन व तपासणी करुन खालील प्रमाणे कारवाई केलेली आहे.
आरोपी चेकींग अभियानमध्ये एकुण २५४४ गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी ७५७
गुन्हेगार मिळुन आले आहेत. परिमंडळ १ मधील एकुण ६ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई खालीलप्रमाणे
परिमंडळ-१ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे १ केस करुन १ आरोपीस अटक करुन त्याचेकडुन १ कोयता रु. २५० चा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दारुबंदीची १ केस करुन १ आरोपींकडुन ३,०१० चा गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
परिमंडळ २ मधील एकुण ६ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई खालीलप्रमाणे
परिमंडळ – २ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी १ व गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले आरोपी अटक करण्यात आलेले आहे. कलम ४/२५ प्रमाणे २ केस करून २ आरोपीस अटक करून त्याचेकडुन कोयते रु. ३०० चे जप्त करण्यात आलेले आहे. तसेच दारुबंदीची ७ फेस करून ७ आरोपीकडुन रु. ५,७०० चा गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. प्रोबिशन प्रमाणे ५ केस करण्यात आलेली असुन १ आरोपींकडुन रु. १,१२० चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या २ आस्थापनांवर योग्य ती कारवाई केलेली आहे.
परिमंडळ ३ मधील एकुण ६ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई खालीलप्रमाणे :-
परिमंडळ – ३ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले २ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. तसेच दारुबंदीची ५ केस करुन ५ आरोपींकडुन रु. ४,१९५ चा गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. प्रोव्बिशन प्रमाणे १ केस करण्यात आलेली असुन २ आरोपींकडुन रु. ६०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या १ आस्थापनांवर योग्य ती कारवाई केलेली आहे. तसेच ९ खटले दाखल केले आहे.
परिमंडळ ४ मधील एकुण ७ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई खालीलप्रमाणे :
परिमंडळ-४ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतु अटक नसलेले ३ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. तडीपार आदेशाचा भंग केल्याने १ आरोपीस मपोका १४२ प्रमाणे १ केस करण्यात आलेली आहे. तसेच तसेच दारुबंदीची ११ केस करून ११ आरोपींकडुन रु. ९.३५० चा गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. प्रोव्हिबिशन प्रमाणे ५ केस करण्यात आलेली असुन ५ आरोपींकडुन रु. ७७५५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ध्वनी प्रदुषण बाबत ३ केस करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोटपाचे ९ खटले दाखल केले आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या १० आस्थापनांवर योग्य ती कारवाई केलेली आहे..
परिमंडळ ५ मधील एकुण ७ पोलीस स्टेशनमधील केलेली कारवाई खालीलप्रमाणे :
परिमंडळ-५ मध्ये विशेष मोहिमे दरम्यान. अॅ कलम ४/२५ प्रमाणे ४ केस करून ४ आरोपीस अटक करुन त्याचेकडुन ३ कोयता रु. ४०० व १ सुरा रु ५५० चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दारुबंदीची १४ केस करुन १४ आरोपींकडुन रु. १४,८५० चा गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच कोटपाचा १ खटला दाखल केला आहे.
गुन्हे शाखेने केलेली कारवाई खालीलप्रमाणे
युनिट ३ पर्वती पोस्टे. गुरनं. १५७/२०२३ क ३२४, ३५२,३२३, ५०४,३४ मधील आदित्य युवराज भालेराव वय १९, रा. महात्मा फले वसाहत, सिंहगड रोड, पुणे, ऋतिक दिलीप कांबळे वय २३. रा. महात्मा फले वसाहत, सिंहगड रोड, पुणे गौरव वामन चव्हाण वय २३ रा. हिंगणे खुर्द, पुणे, अजय राजु दास वय १९, रा. महात्मा फले वसाहत, सिंहगड रोड, पुणे यास अटक करुन पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
अंमली पदार्थ विरोधी पथक लोणी काळभोर पो स्टे येथे एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल
करुन आरोपी नामे अक्षय इरेश शिंदे वय २२, रा. मयुरी कॉलनी, हांडेवाडी रोड, पुणे याचे ताब्यातुन १
किलो २२७ ग्रॅम गांजा रु. २४,५४० – १ मोबाईल रु. ५,००० व १ दुचाकी अॅक्टीवा रु. ८०,०००
मुद्देमाल जप्त करुन आरोपीस पोलीस स्टेशन ताब्यात दिले.. अॅ. कलम ४/२५ प्रमाणे ३ केसेस करुन ३ आरोपीस अटक करुन त्याचेकडुन २ कोयते रु. १,५०० – व १ लोखंडी सुरा रु. ४०० चा जप्त करण्यात आलेला आहे. तडीपार आदेशाचा भंग केल्याने आरोपीविरुद्ध मपोका १४२ प्रमाणे २ केसेस करण्यात आलेल्या आहेत. दारुबंदीच्या ९ केसेस करुन आरोपींकडुन रु. २७,३५० चा दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच कोटपाचे ११ खटले दाखल केले आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या ३ आस्थापनांवर योग्य ती कारवाई केली आहे..
सदर विशेष मोहिमे दरम्यान एकुण कारवाईचा आढावा घेतला असता खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
विश्रामबाग, शिवाजीनगर, सहकारनगर, उत्तमनगर, सिंहगडरोड , येरवडा, विमानतळ, चंदननगर, कोंढवा व बिबवेवाडी या पोलीस स्टेशनने बेलेबल व नॉन बेलेबल वारंट बजावणी उत्कृष्ठपणे केलेली आहे. मुंबई प्रोव्हिबीशन अॅक्ट प्रमाणे एकुण गुन्हे शाखेने ९ कैसेस करून ९ आरोपींकडून रोख व गावठी दारू असा रु. २७,३५० व पोलीस स्टेशनने ३८ केसेस करुन ३८ आरोपींकडुन रु. ३७.१०५ – मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
> महा. जुगार अॅक्ट प्रमाणे पोलीस स्टेशनने एकुण ७ केस करुन ८ आरोपींकडुन रु. ९,४७५ चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकुण ५५० हॉटेल, ढाबे व लॉजेस चेक, तसेच १५७ एस टी स्टॅण्ड,रेल्वे स्थानक,निर्जन ठिकाणे चेक करण्यात आले आहे.
पोलीस स्टेशनकडुन नाकाबंदी दरम्यान ९६५ संशयित वाहन चालकांना चेक करुन २५७ जणांवर रु. २, २४, २०० – ची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतुक शाखेकडून ५००७ संशयित वाहन चालकांना चेक करून २६५ जणावर वाहन धारकांवर कारवाई
करुन रु. २,२५,८००- दंड वसुल करण्यात आला आहे.
वरील प्रमाणे पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार यांचे आदेशान्वये पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, . अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, . पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, . संदीप सिंह गिल्ल, . पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ४, शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ५ विक्रांत देशमुख, . पोलीस उप आयुक्त वाहतुक विभाग, विजयकुमार मगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाणेकडील अधिकारी, अंमलदार तसेच वाहतुक विभागाकडील अधिकारी, अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे उपरोक्त कामगिरी केली आहे. यापुढेही कोम्बींग ऑपरेशन व नाकाबंदी चेकींग राबवुन गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
तपशील
आर्म्स अॅक्ट ४/२५
एकुण कारवाया
१०
अटक आरोपी
१०
मुंबई प्रोव्हिबीशन अॅक्ट
जुगार केसेस
४७
७
३
४७
८
३
मपोकाक १४२ कारवाई
१.
६८.
४ एनडीपीएस
एकुण
१
६९