पुणे ( महागर्जना प्रतिनिधी ) दि. १३ रोजी फिर्यादी यांची ऑटोरिक्षा चोरी झाली होती. त्यांच्या तक्रारीवरून त्या बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २०५/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे समर्थ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार, हेमंत पेरणे व शरद घोरपडे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, चोरीला गेलेली रिक्षा एम.एच.१२ एफ.सी. १६५८ ही चारणे रोड मंगळवार पेठ, पुणे या ठिकाणी थांबलेली असून, त्यात दोन इसम बसलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
मिळालेल्या बातमीचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व स्टाफ सदर ठिकाणी गेले असता, सदरची रिक्षा मध्ये दोन इसम दिसून आले. ते दोन्ही इसम पोलीसांना पाहुन रिक्षा सोडून पळुन जावू लागले. त्यावेळी त्यांचा पाठलाग करुन आलीम अल्ताफ पालकर, वय २६ वर्ष, रा. आलीम टॉवर जवळ, घर क्रं. २, गल्ली नं. ३, कोंढवा, पुणे २, अक्तर हसन शेख, वय २४ वर्ष, रा. ग्रीन पार्क, गल्ली नं. २, घर क्रं.६०, कोंढवा, पुणे त्यांना पकडले. त्यांचेजवळ असलेल्या रिक्षा एम.एच.१२ एफ. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटो रिक्षाच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना सोबतचे पोलीस स्टाफच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता दोघांनी सदरची रिक्षा एम.एच.१२/एफ. सी. १६५८ ही ऑटो रिक्षा ११२३ न्यु नाना पेठ, पुणे येथून चोरल्याची कबुली दिली आहे. अधिक तपासात अजून एम.एच.१२ एफ.सी. ०३९८ ऑटोरिक्षा व एम. एच. १२ जेई २२०० दुचाकी अशी वाहने समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरल्याचे सांगितले.
समर्थ पोलीस स्टेशन येथील अभिलेख तपासले असता गु.र.नं.२०७ / २०२३ व २०८ / २०२३ असे गुन्हे दाखल आहेत. सदरचे तिन्ही वाहने पंचनाम्याने ताब्यात घेवून सदर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन, आरोपींवर यापुर्वी चोरीचे व घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, . पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पुणे, संदीप गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे, अशोक धुमाळ, समर्थ पोलिस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक, सुनिल रणदिवे, सौरभ थोरवे, सहा. पो. फौज दत्तात्रय भोसले, पोलीस अंमलदार, हेमंत पेरणे, शरद घोरपडे, रहीम शेख, रोहीदास वाघेरे, प्रमोद जगताप, गणेश वायकर, शहाजी केकान, अमोल शिंदे, ढगे, जितू पवार,ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी केली आहे.