दिनांक २३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्र यांना यातील नमुद इसम रणजीत राजेंद्र सिंग याने तो आर्मी इंटेलिजन्स मध्ये रेकॉर्ड ऑफिस मध्ये काम करीत असल्याचे सांगून आर्मी ऑफिसर मधील ए. ओ. सी. मध्ये सिकंदराबाद येथे भरती करतो असे सांगून त्यांना बनावट नियुक्ती पत्र दिले. तसेच स्वतःचे बनावट आयकार्ड दाखवून फिर्यादी व त्यांचे मित्रांची एकूण १२,८०,००० रुपये रोख व ऑनलाईन स्वरुपात स्विकारुन फसवणूक केले. या बाबतची तक्रारी वरून वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४७२ / २०२३, भा. दं.वि. कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७५, ४७० १७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेचे गांभीर्य बगता तात्काळ सदर तक्रारीवरून तोतया अधिकारी यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी पोलीस उप-निरीक्षक, अजय शितोळे, पोलीस अंमलदार, अमोल गायकवाड व नितीन भोसले यांना दिलेले होते.
नमुद दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करीत असताना गुन्हयातील आरोपी रणजीत कुमार राजेंद्रसिंग, वय ३४, रा. कोईमत्तुर, राज्य तमिळनाडु हा साळुंके-विहार रोड येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जावून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी करता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमूद अटक आरोपीकडून तीन एअर गन व त्याचे कॅप्सूल, आर्मीचे बनावट ओळखपत्र,आर्मीचे गणवेश, व इतर साहित्य, आर्मीचे बनावट रबरी स्टॅम्प, लॅपटॉप, बनावट सर्विस सेवापत्र, पेन ड्राईव्ह व मोबाईल असा एकुण ०१,०६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक अजय शितोळे हे करीत आहेत..
सदरची कामगीरी . पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, . संदिप कर्णीक, . अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे .रंजनकुमार शर्मा, . पोलीस उप- आयुक्त, परि – ०५, पुणे, . विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे, शाहुराव साळवे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक, गुन्हे, विनय पाटणकर व पोलीस उप-निरिक्षक अजय शितोळे, संतोष सोनावणे, पोलीस अंमलदार, संतोष नाईक, अतुल गायकवाड, संतोष काळे, महेश गाढवे, अमजद पठाण, हरिदास कदम, राहुल गोसावी, अमोल गायकवाड, नीती न भोसले, विठ्ठल चोरमले राहुल माने, विष्णू सुतार, संदिप साळवे, निळकंठ राठोड, सोनम भगत, रुपाली साबळे यांनी केली आहे…सदरबाबत वानवडी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येत आहे की, नमुद आरोपीकडून अजून कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्यांनी वानवडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.