(महागर्जना पुणे) दि .१ अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील पटवर्धन बाग एरंडवणे येथील अनिल नाईक यांच्या साईश्रद्धा बगल्यातुन पहाटेच्या वेळेस लक्ष्मीपुजनाकरीता ठेवण्यात आलेले सोन्याचे दागीने, ४ लाख रुपये रोख रक्कम असा जवळपास ९ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याने अनिल नाईक यांनी त्याबाबत अलंकार पोलीस स्टेशन येथे चोरीची तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखुन अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी तात्काळ गुन्हा नोंद करुन तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीसांनी गुन्हा नोंद करुन तपासाची सुरूवात केली. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे यांच्याकडे तपास देण्यात आला, पोलीसांनी घटनास्थळी भेट देवुन परिसरातील सिसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरिल आरोपीकडे तपास सुरू केला. दरम्याण अलंकार पोलीस स्टेशन च्या तपास पथकाचे प्रभारी व सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे, पोलीस हवालदार घिरज पवार, निशिकांत सावंत, हरि गायकवाड यांना त्यांच्या गोपनीय बातमी द्वारे बातमी मिळाली की नांदेडगाव जगताप नगर येथील संतोष किसन शिलोत याने सदरची घरफोडी केली असुन तो त्याच्या घरी लपुन बसला आहे.त्या माहीतीवरुन तात्काळ तपास पथकाने संतोष शिलोत यास ताब्यात घेवुन त्याच्या गुन्ह्याच्या अणुषागाने तपास व गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत माहीती घेतली संतोष शिलोत याने घरफोडी केल्याचे कबुल केल्याने त्यास पोलीसांनी गुन्ह्यात अटक करुन त्याची पोलीस कस्टडी घेवुन पोलीसांनी त्याच्या ताब्यातुन त्याने फिर्यादी यांच्या घरातुन चोरी केलेले सोन्याचे दागीने, ३.५० लाख रुपये रोख रक्कम, गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटारसायकल मोबाईल असा तब्बल १२ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गतवर्षिदेखील अलंकार पोलीस स्टेशनच्या तपासपथकाचे सुर्यकांत सपताळे व अंमलदारांनी कर्वेनगर मधील घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्विरित्या उकल करुन १ कोटी रुपयांपेक्षा अधीकचा मुद्देमाल जप्त केला होता.
- सदर ची कामगीरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ सुहेल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलिस निरीक्षक गुन्हे संगिता पाटील यांच्या मार्दगर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे, सहा यक फव्जदार . निंबाळकर, पोलिस हवालदार धिरज पवार,पोलीस हवालदार निशिकांत सावंत, पोलीस हवालदार सोमेश्वर यादव, पोलीस अंमलदार हरि गायकवाड, राठोड, सर्विलन्स चे शरद चव्हाण, होले, शिवडकर, शिवा शिंदे, राउत यांनी केली.