पुणे : गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस अंमलदार हे युनिटचे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना, युनिट कडील पोलीस अंमलदार, सकटे आणी मुंढे यांना खात्रीशीर बातमी खबऱ्याकडून मिळाली की, इसम स्वप्नील व्हणमाने याचेकडे चोरीची वाहन असुन, तो सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ काळेपडळ, हडपसर येथे सार्वजनिक रोडवर उभा आहे अशी माहिती मिळाली.
त्या बातमीचे अनुशंगाने वरिष्ठांचे सूचनेप्रमाणे तात्काळ युनिट-६ कडील अंमलदार हे हडपसर भागात पुणे सासवड रोडवर जावुन बातमीतील वर्णनाच्या इसमाचा शोध घेत असताना, नमुद बातमीतील वर्णनाचा इसम सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ, काळेपडळ, हडपसर येथे सार्वजनिक रोडवर उभा असलेला दिसला. त्यास त्याचे ताब्यातील मोटार सायकल ताब्यात घेऊन, त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव स्वप्नील नागनाथ व्हणमाने, वय-२३, राहणार. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे त्याचे ताब्यातील मोटार सायकलचे मालकी हक्काबाबत कागदपत्रांची विचारपुस केली असता त्याने कोणतीही कागदपत्रे दाखवली नाही , ती मोटार सायकल चोरीची खात्री झाल्याने, त्याला सी. आर. पी. सी ४१ (१) (ड) प्रमाणे अटक केली आहे.
आरोपीकडे अधिक तपास केला असता , त्याचेकडुन हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर ५७/२०२४ भा.द.वि.क.३७९, हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजी नंबर १००/२०२३, भा.दं.वि. कलम ३७९,सिंहगड पोलिस स्टेशनं गुन्हा रजिस्टर नंबर ६५/२०२१,भा .दं.वि.कलम ३७९, शिक्रापुर पोलिस स्टेशनं गुन्हा रजिस्टर नंबर ११५/२०२०, भा.दं. वि. कलम ३७९ असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १,१५,००० रुपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत. त्याचेवर यापुर्वी हडपसर पो स्टे व सदर बाजार पो स्टे, सोलापुर याठिकाणी वाहन चोरीच गुन्हे दाखल आहेत. पुढील कार्यवाहि साठी आरोपीस हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले. हि
- कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पुणे, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२.पुणे. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक, उल्हास कदम, पोलीस अंमलदार, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.