पुणे :पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील तुळशीबागवाले कॉलनी, सहकार नगर, पुणे येथे जेष्ठ महिला फिर्यादी हे सायंकाळी रस्त्यावरून पायी चालत असताना, त्यांचे पाठीमागुन मोटार सायकल चालकाने फिर्यादी यांचे गळयातील सोन्याचा नेकलेस हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेला होता. त्याबाबत पर्वती पोलीस स्टेशनं येथे गुन्हा रजि.नं. १७/२०२४ भा.द.वि कलम ३९२ नुसार दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयांचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहकारनगर भागामध्ये येण्याचे व जाण्याचे मार्गावर तांत्रिक विश्लेषणाव्दारे नमुद चेन स्नॅचरचा माग काढत असताना, पोलीस अंमलदार, प्रकाश मरगजे, अमित चिव्हे यांना दाखल गुन्हयांतील आरोपी हा लक्ष्मी रोड येथे गाडीसह उभा असल्यचे दिसुन आले. त्याबाबत माहिती तात्काळ वरिष्ठांना कळवुन, त्यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे पोलीस उप निरीक्षक, चंद्रकांत कामठे तपास पथकाचे स्टाफसह नमु द रस्त्यांवर सापळा लावुन अत्यंत चिकाटीने त्या इसमास पकडुन त्याचा नांव पत्ता विचारले असता , त्याने त्याचे नांव शशिकांत यशवंत पाटोळे, वय-३२ वर्षे, राहनार लेन नं.१४, दत्तमंदीर जवळ, जनता वसाहत, पर्वती, पुणे असे सांगितले. त्याचेकडुन गुन्हयांत चोरलेले दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व मोटार सायकल असा १,३०,००० रुपये .किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीस अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता, त्याने घडलेल्या गुन्हयाबाबत कबुली दिली असुन दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने शेअर मार्केट मध्ये नुकसान झाल्याने चेन स्नॅचिंग केली असल्याचे सांगितले आहे. त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामटे हे करत आहेत.
हि कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रवीण कुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल ३, संभाजी कदम, . सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, . जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार, प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, अमोल दबडे, दयानंद तेलंगे-पाटील, प्रशांत शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, सुर्या जाधव आणि सद्दाम शेख यांनी केली आहे.