पुणे (सतीश जाधव )
दि. १० रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे पथक शिरूर परीसरात शिरूर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत असताना, गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे गोलेगाव ता. शिरूर जि. पुणे या गावाकडे जाणारे रोडवर पुणे ते अहमदनगर हायवे ब्रिज जवळ काळया रंगाच्या काचा असलेली एक लाल रंगाची स्विफ्ट कार पहाटेच्या वेळी येणार असून कार मधील इसम हे पिस्टल ची देवाण घेवाण करणार आहेत, अशी बातमी मिळाली होतो.
ह्या बातमीचा आशय वरीष्ठांना सांगून त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गोलेगाव ता. शिरूर जिल्हा पुणे गावाकडे जाणारे रोडलगत पुणे-अहमदनगर हायवे ब्रीज येथे आलेल्या एका लाल रंगाचे स्विफ्ट कारवर कारवाई केली असता, कारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे संकेत संतोष महामुनी वय २४ वर्षे, रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, अभिषेक ऊर्फ घ्या हनुमान मिसाळ, वय २३ वर्षे, रा. सोनारआळी, शिरूर ता. शिरूर जि. पुणे, शुभम दत्तात्रय दळवी, वय २७ वर्षे, रा. प्रितमप्रकाश नगर, शिरूर ता. शिरूर जि. पुणे, गणेश ऊर्फ श्रीरंग शंकर महाजन, वय ३० वर्षे रा. गोलेगाव, ता. शिरूर जि. पुणे हे मिळून आले. त्यांचेकडून तीन गावठी पिस्टल व नऊ जिवंत काडतूस मिळून आले आहेत.
ह्या आरोपींवर अवैध अग्निशस्त्र बाळगणे व शरीराविरूद्धचे मारामारीचे गुन्हे यापूर्वी दाखल असून यातील आरोपी नामे संकेत संतोष महामुनी यास काही महीन्यापूर्वीच अवैध पिस्टल बाळगून विक्री केले प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेवून त्याचेकडून आठ पिस्टल हस्तगत केले होते.
सदर आरोपी नामे संकेत महामुनी याचेवर ४ गुन्हे, आरोपी अभिषेक मिसाळ यांचेवर २ गुन्हें आरोपी शुभम दळवी यांचेवर ४ गुन्हे, आरोपी गणेश महाजन याचेवर ०६ गुन्हे असे यापूवी गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता, त्यांची दि. १३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून आरोपींनी अवैध पिस्टल कोठून आणले आहेत, कोणत्या कारणासाठी आणले आहेत, याबाबत पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहेत,
सदरची कामगिरी हि पोलीस अधीक्षक . पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी . प्रशांत डोले शिरुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस शिपाई गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, संजय जाधव योगेश नागरगोजे, चालक मुकुंद कदम चालक पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.