पिंपरी चिंचवड (सतीश जाधव )
प्रतीक रामप्रकाश यादव वय २९ वर्ष रा. शैलेश दगडे चाळ पाटीलनगर बावधन जि.पुणे हे दि.९ रोजी रात्री ८ ते दिनांक १० रोजी सकाळी ८ वाजण्याचा दरम्यान अॅन्सुइव्हा सोसायटीचे गेटरवर वॉचमन म्हणून डयूटी करीत असताना त्यांनी त्यांचा मोबाईल चार्जीगला लावला असताना रात्रीचे वेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीच्या इरादयाने त्यांचा मोबाईल चोरून हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १५२/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. राम गोमारे सहायक पोलीस निरीक्षक यांना बातमी मिळाली की, माण गाव परिसरात एक जण
मोबाईल विक्री साठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने राम गोमारे सहा पो निरीक्षक तसेच सहा पो. उप निरीक्षक बापुसाहेब घुमाळ, पो. हवा १५७४ नरळे, पोकों, २४०१ कांबळे पो.हवा ६९४ शिंदे यांनी माणगावात सापळा रचुन शिताफीने आरोपी पळून जाण्याचे तयारीत आरोपी नामे रियाज शाहादुल्ला शेर २१ वर्षे, रा. अंबराई कोकाटे चाळ नंदु कोकाटे यांची चाळ किराणा दुकाना शेजारी पाषाण सुतारवाडी। दिनांक १० रोजी पकडुन त्याचेकडुन सदर गुन्हयातील मोबाईल व इतर ११ मोबाईल एकुण २,२८,००० रू किंमतीचे १२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. इतर मोबाईल धारकांचा शोध आहे.
हि कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त परि. २. बापु बांगर,सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापु देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, राजाराम सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.